Khartum sakal
ग्लोबल

Sudan Treaty of Arms : सुदानमध्ये सात दिवसांसाठी शस्त्रसंधी लागू

यादवी युद्धात होरपळून निघणाऱ्या सुदानमध्ये सोमवारी रात्रीपासून सात दिवसांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली.

पीटीआय

न्यूयॉर्क - यादवी युद्धात होरपळून निघणाऱ्या सुदानमध्ये सोमवारी रात्रीपासून सात दिवसांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली असून या शस्त्रसंधीचा दोन्ही गटांनी सन्मान राखावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे. सुदानमधील संयुक्त राष्ट्राचे अधिकारी वोल्कर पर्थेस यांनी ही शस्त्रसंधी देशातील यादवी युद्ध थांबविण्यासाठी आणि शांततापूर्ण चर्चेसाठी मार्ग मोकळा करू शकते, असा आशावाद व्यक्त केला. वोल्कर पर्थेस हे सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेचे (युनिटामस)चे प्रमुख आहेत.

सुदानच्या घटनाक्रमाची वोल्कर पर्थेस यांनी सुरक्षा समितीला सोमवारी माहिती दिली. १५ एप्रिलपासून सुरू झालेला संघर्ष हा दोन्ही बाजूंनी सहा वेळेस शस्त्रसंधी करूनही थांबला नाही, असे ते म्हणाले. मागील सर्व शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी सांगितले. सुदानमध्ये जीवनमान संकटात सापडले असून पायाभूत सुविधा जमीनदोस्त केल्या जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडल्याने मानवीय सहायता करण्यास अडचणीत येत आहेत.

सुदान येथे सशस्त्र दल (एसएएफ) आणि आरएसएफ यांच्यात पंधरा एप्रिल रोजी युद्ध भडकले आणि देशाची वाताहत सुरू झाली. पण आता आठवडाभर शस्त्रसंधी कराराचे पालन झाले तर लाखो गरजू लोकांपर्यंत मदत पोचवणे सोपे जाईल आणि शांततेच्या वाटाघाटी करण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पण देशात मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन, लूटमार आणि शस्त्रास्त्रांची वाढलेली प्रचंड संख्या पाहून पर्थेस यांनी चिंता व्यक्त केली.

युद्धाला जातीयतेचे रुप दिल्याने हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याचा धोका निर्माण झाला असून त्याचे दूरगामी परिणाम देशातील सर्वात क्षेत्रावर होऊ शकतो. त्यामुळे सुदान आणि देशातील नागरिकांसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या संघर्षाची जबर किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागली असल्याचे ते म्हणाले. गेल्या महिनाभरातील हिंसाचारात ७०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात १९० बालकांचा समावेश आहे. तसेच सहा हजार जण जखमी झाले असून असंख्य बेपत्ता झाले आहेत.

सुमारे दहा लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले असून त्यापैकी साडे आठ लाख नागरिकांनी देशाच्या अन्य भागात आश्रय घेतला आहे. त्याचवेळी अडीच लाख लोक जीव धोक्यात घालून देशाबाहेर पळून गेले आहेत. स्थलांतरित लोकांत सुमारे ८ हजार गर्भवती आहेत. वोल्कर पर्थेस म्हणाले, की राजधानी खार्तुम, दारफूर आणि अन्य ठिकाणी युद्ध कायद्याची पर्वा न करता संघर्ष सुरू आहे. असंख्य महिला आणि युवतींना लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घरांवर हल्ले, दवाखाने बंद

सुदानमधील संघर्षात घरांवर हल्ले केले गेले असून दुकानाची लूटमार झाली आहे. याशिवाय प्रार्थनास्थळे, पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा, वीज प्रकल्पावरही हल्ले करण्यात आले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देशातील दोन तृतीयांश दवाखाने बंद आहेत. अनेक आरोग्य कर्मचारी हल्ल्यात मारले गेले आहेत. वैद्यकीय पुरवठ्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. आरोग्य यंत्रणा केवळ लष्करी सेवेसाठी वापरली जात असल्याचे ‘यूएन’चे पर्थेस यांनी सांगितले. तुरुंगातून हजारो कैदी बाहेर आल्याने आणि शस्त्रे उपलब्ध झाल्याने देशात गुन्हेगारी वाढली आहे. सात दिवसांच्या शस्त्रसंधीमुळे शत्रुत्व संपविण्यासाठी हालचाली करण्याबाबत आशावादी आहोत. यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT