evergiven 
ग्लोबल

भारतात पेट्रोल डिझेलचा भडका उडणार? सुएझ कालव्यात अडकलंय जहाज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गेल्या तीन दिवसांपासून जगातील सर्वात महत्त्वाच्या अशा सुएझ कालव्यात एवर ग्रीन हे जहाज अडकलं आहे. या जहाजामुळे सुएझ कालव्यातील जल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. युरोप आणि आशिया खंडाला जोडणारा हा जवळचा जलवाहतूक मार्ग असून इजिप्तमधून भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोन्हींना जोडतो. जगभरातील एकूण व्यवसायामध्ये 12 टक्के वाटा या कालव्याचा आहे. 1869 मध्ये तयार करण्यात आलेल्या या कालव्यावर इजिप्तचा ताबा आहे. इजिप्तची अर्थव्यवस्थाच या कालव्यावर अवलंबून आले. 2020 मध्ये इजिप्तने सुएझ कालव्यात टोलमधून 5.61 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. आता गेल्या तीन दिवसांपासून यातील वाहतूक ठप्प झाली आहे. मंगळवारी पनामाचं एक मोठं जहाज या कालव्यात अडकून बसलं आहे. 

कंटेनर वाहतूक करणारं शिप असलेलेल्या एवर गिवन जहाजातून चीनमधून नेदरलँडला मालवाहतूक केली जात होती. 2018 मध्ये तयार करण्यात आलेलं जवळपास तीन फुटबॉलच्या मैदानाइतकं हे जहाज मोठं आहे. 400 मीटर लांबी आणि 59 मीटर उंची असलेलं हे जहाज खराब हवामानामुळे कालव्यात अडकलं. या जहाजावर जवळपास 2 लाख टन माल आहे. जहाज कालव्यात अडकल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. जहाज चालवणारी तैवानची ट्रान्सपोर्ट एवरग्रीन मरीनने सांगितलं की, अचानक आलेल्या वेगवान हवेमुळे जहाज तिरके झाले आहे कालव्यात अडकून पडले. 

जहाजाचा अवाढव्य आकार आणि त्यावर लादण्यात आलेल्या मालामुळे हटवण्यामध्ये अडचणी येत आहेत. यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. सुएझ कालव्यातून वाहतूक सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वाहतुक ठप्प झाल्यामुळे जगातील अनेक देशांना नुकसान सहन करावं लागत आहे. युरोप आणि आशियाला जोडणारा आणखी एक कालवा आहे. मात्र सुएझ कालव्याच्या तुलनेत तो लांब आणि खर्चिक आहे. परिणामी जागतिक व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सुएझ कालव्यातून जगातील एकूण कंटेन जहाजांपैकी 30 टक्के जहाजं जातात. त्यामुळे एवर गिवन अडकल्यानं कालव्यातील जलवाहतुकीची कोंडी झाली आहे. गेल्या वर्षी या कालव्यातून दररोज लहान मोठ्या अशा 19 हजार जहाजांनी प्रवास केला अशी माहिती सुएझ कालव्याच्या प्रशासनाने दिली आहे. 2020 मध्ये अनेक देश लॉकडाऊनमध्ये असतानाही मोठी वाहतूक झाली. 

जहाज अडकल्यानं वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम क्रूड ऑइलच्या दरावरसुद्धा झाला आहे. क्रूड ऑइल तीन टक्क्यांनी महाग झाला आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर महाग होऊ शकतात. भारतात आधीच पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरीकडे झेप घेतली आहे. त्यात पुन्हा क्रूड ऑइल महागल्यास त्याचे परिणाम देशातील इंधन दरावर होतील. क्रूड ऑइलशिवाय धातुंसह इतर वस्तुंच्याही किंमती आणि दरांमध्ये चढ उतार झाला आहे. निकेल, अॅल्युमिनिअम आणि लेडमध्येही एक टक्क्याची वाढ झाली असून झिंक आणि कॉपरच्या किंमतीही वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून सोयाबीन महागलं आहे.  MCX CPO मध्ये दीड टक्के घसरण झाली असून मसाल्यांचे पदार्थही स्वस्त झाले आहेत.भारतात पेट्रोल डिझेलचा भडका उडणार? सुएझ कालव्यात अडकलंय जहाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT