तेपैई - तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपप्रमुख व मुख्य क्षेपणास्त्र निर्मितीतील मुख्य अधिकारी ओ यांग लिसिंग यांचा मृतदेह दक्षिण तैवानमधील एका हॉटेलमधील खोलीत शनिवारी संशयास्पदरीत्या आढळला.
ही माहिती तैवानच्या ‘सेंट्रल न्यूज एजन्सी’ या अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर तैवानचे चीनबरोबरील संबंध आणखी बिघडले आहेत. अशातच तैवानला आज आणखी एक झटका बसला. ओ यांग हे पिंगटुंग येथे व्यावसायिक दौऱ्यावर गेले होते. हॉटेलमधील खोलीत आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूचे कारण पोलिस शोधत आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपप्रमुखपदाचा कार्यभार ओ यांग यांनी यावर्षीच स्वीकारला होता. तैवानच्या क्षेपणास्त्र निमिर्तीच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. दरम्यान, तैवानच्या मुख्यभूमीच्याजवळ १०० लढाऊ विमाने आणि दहा युद्धनौकांसह चीनने काल युद्ध सराव केला, असे वृत्त चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिले होते.स्वशासित लोकशाहीच्या भूभागावर चीन प्रारूप हल्ला करीत आहे. चीनच्या या कारवाईला उत्तर देण्यासाठी तैवानने त्यांच्या सैन्याला दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.
तैवानचा आरोप
चीनने आजही तैवानच्या सामुद्रधुनीत हवाई व सागरी युद्धसराव केला. सैन्याची युद्धक्षमता परखण्यासाठी हा सराव केल्याचा दावा चीनने केला असला तरी यातून तैवानवर हल्ला करण्याची तयारी चीन करीत असल्याचा आरोप तैवानने केला आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की तैवानच्या सामुद्रधुनीजवळ चिनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या विमानांनी मध्य रेषा भेदली आहे. आमच्या देशातील अति महत्त्वाच्या गोष्टींवर हल्ला करण्याची तयारी चीन करीत आहे.
‘शक्तीप्रदर्शनाचा अमेरिकेवर परिणाम नाही’
मनिला ः तैवानबाबत चीनची आक्रमक भूमिका आणि शक्तीप्रदर्शनाचा कोणताही परिणाम अमेरिकेवर झालेला नाही, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन शनिवारी केला. आम्ही आमचे मित्रदेश आणि भागीदारांच्या सुरक्षेवर ठाम आहोत, असे ते म्हणाले. कंबोडियात ‘आसियान’ बैठकीनंतर मनिलाला पोहोचण्यापूर्वी ब्लिंकन यांनी विधान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.