Crime News sakal
ग्लोबल

Attack On Temple : खलिस्तानी समर्थकांकडून स्वामीनारायण मंदिराची तोडफोड

हल्लेखोरांनी मंदिराच्या भिंतींवर भारताविरोधात घोषणाही लिहिल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

Swami Narayan Temple : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलिस्तान समर्थकांनी 12 जानेवारीला सकाळी मेलबर्नच्या उत्तरेकडील उपनगरातील मिल पार्कमधील BAPS स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करत तोडफोड केली. हल्लेखोरांनी मंदिराच्या भिंतींवर भारताविरोधात घोषणाही लिहिल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर मंदीर प्रशासनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. "आम्हाला या घटनेमुळे दुःख आणि धक्का बसला असून, आम्ही शांतता आणि सौहार्दासाठी आम्ही प्रार्थना करतो. लवकरच या घटनेबद्दल अधिक तपशील शेअर केले जातील असे मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रार्थनास्थळांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा द्वेष आणि तोडफोड अस्वीकार्य असल्याचे म्हणत हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष मकरंद भागवत यांनी निषेध व्यक्त केला आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही भागवत यांनी केली आहे.

धार्मिक द्वेषाला जागा नाही

दुसरीकडे नॉर्दर्न मेट्रोपॉलिटन रिजनचे खासदार इव्हान मुलहोलँड म्हणाले की, ही तोडफोड ऑस्ट्रेलियातील शांतताप्रिय हिंदू समुदायासाठी अत्यंत दुःखद आहे. अशा धार्मिक द्वेषाला येथे स्थान नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT