Swastika Symbol Ban in Australia esakal
ग्लोबल

Swastika Symbol : ऑस्ट्रेलियात 'स्वस्तिक' चिन्हावर बंदी; संसदेत विधेयकाला मंजुरी

स्वस्तिकाकडं हिंदू धर्मात मोठ्या श्रद्धेनं पाहिलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

स्वस्तिकाकडं हिंदू धर्मात मोठ्या श्रद्धेनं पाहिलं जातं.

स्वस्तिकाकडं (Swastika Symbol) हिंदू धर्मात मोठ्या श्रद्धेनं पाहिलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 'स्वस्तिक' चुकीच्या कारणांमुळं पुन्हा चर्चेत आलंय. ऑस्ट्रेलियातील (Australia) दोन राज्यांनी या चिन्हावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. असं म्हटलं जातंय की, हे चिन्ह नाझींचं प्रतीक आहे.

स्वस्तिक चिन्ह कोणत्याही प्रकारे दाखवणं गुन्हा

ऑस्ट्रेलियानं हे चिन्ह गुन्हेगारीच्या श्रेणीत ठेवलंय. वास्तविक गार्डियनच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया, साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन राज्यांमध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्यात आलीय. इथं स्वस्तिक चिन्ह कोणत्याही प्रकारे दाखवणं हा गुन्हा मानला जाणार आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि तस्मानियानंही स्वस्तिकावर बंदी घालण्याची चर्चा केलीय. ऑस्ट्रेलियानं हा निर्णय अचानक घेतला नसून, त्यावर बंदी घालण्याची तयारी आधीच सुरू होती.

नाझी प्रतीक बंदी विधेयकाला संसदेत मंजुरी

अहवालानुसार, सुमारे एक वर्षाच्या चर्चेनंतर आणि विविध समुदायांशी सल्लामसलत केल्यानंतर, आणलेलं विधेयक व्हिक्टोरिया राज्याच्या संसदेनं गेल्या आठवड्यात मंजूर केलं. याअंतर्गत राज्यात नाझी चिन्हं दाखवणं गुन्हा ठरला आहे. नाझी प्रतीक बंदी विधेयक 2002 ला मंगळवारी संसदेनं मंजुरी दिली. न्यू साउथ वेल्सचे अॅटर्नी जनरल मार्क स्पीकमन यांनी मंगळवारी संसदेत सांगितलं की, 'नाझी स्वस्तिकनं यहुदी धर्मासह समुदायाच्या सदस्यांना हानी पोहोचवलीय.'

फिनलंडनं हवाई दलाच्या चिन्हावरून स्वस्तिक हटवलं

इतकंच नाही तर या विधेयकानुसार, नाझी चिन्ह दाखवणं हा गुन्हा ठरणार असून त्यासाठी 22 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 12 लाख रुपये) दंड किंवा 12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याआधी जुलैमध्ये फिनलंड राज्यानं आपल्या हवाई दलाच्या चिन्हावरून स्वस्तिक चिन्ह काढून टाकलं होतं.

'स्वस्तिक हे नाझीचं प्रतीक'

हे विधेयक मंजूर होताच, अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय. न्यू साउथ वेल्समधील ज्यू बोर्ड ऑफ डेप्युटीजचे सीईओ डॅरेन बार्क्स म्हणतात की, स्वस्तिक हे नाझींचं प्रतीक आहे. त्यातून हिंसा दिसून येते. कट्टरपंथी संघटना त्याचा वापर भरतीसाठी करतात. आपल्या राज्यात त्याच्या कामगिरीवर बंदी घालण्याची चर्चा खूप दिवसांपासून होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT