ग्लोबल

Hinduja family: घरकाम करण्यासाठी भारतातून नोकर घेऊन जायचे, अन्...; ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत हिंदुजा कुटुंबाला तुरुंगवास का झाला?

UK richest Hinduja family: उद्योगपती प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना दोषी ठरविण्यात आले आहे. जीनिव्हामधील आपल्या आलिशान निवासस्थानी भारतातून आणलेल्या नोकरांचे शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता.

कार्तिक पुजारी

लंडन- घरात काम करणाऱ्या नोकरांचे शोषण केल्याबद्दल ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैकी असलेल्या हिंदुजा कुटुंबातील चौघांना चार ते बारा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर मानवी तस्करीचाही आरोप झाला होता. तो मात्र न्यायालयाने अमान्य केला.

उद्योगपती प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना दोषी ठरविण्यात आले आहे. जीनिव्हामधील आपल्या आलिशान निवासस्थानी भारतातून आणलेल्या नोकरांचे शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. नोकरांचा पासपोर्ट काढून घेणे, त्यांना स्विस फ्रँकमध्ये वेतन न देता रुपयांमध्ये देणे, निवासस्थानाच्या बाहेर पडू न देणे, दिवसाचे अनेक तास काम करवून घेणे असे आरोप केले. शिक्षेच्या निकालाविरोधात दाद मागणार असल्याचे हिंदुजांतर्फे सांगितले.

कोर्टाने प्रकाश हिंदुजा यांना चार वर्षे तर कमल हिंदुजा यांना सहा वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे. शिवाय, अजय आणि नम्रता हिंदुजा यांना चार वर्षे तुरुंगवासात राहावं लागणार आहे. याशिवाय नुकसान भरपाई म्हणून 950,000 अमेरिकी डॉलर आणि प्रोसेस फी म्हणून 300,000 डॉलर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

हिंदुजा यांच्या वकीलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंदुजा कुटुंबाची कोर्टात बाजू मांडणारे वकील रोमन जॉर्डन म्हणाले आहेत की, कोर्टाच्या निकालामुळे आम्ही निराश आहोत. आम्ही याप्रकरणी वरच्या कोर्टाचे दार ठोठावणार आहोत. द न्यूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

नग

हिंदुजा समूहाची रिअल इस्टेट, ऑटोमोटिव्ह उत्पादन, बँकिंग, तेल-वायू आणि आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. कोर्टामध्ये दावा करण्यात आला होता की, हिंदुजा कुटुंब घरातील पाळीव कुत्र्यावर घरकाम करणाऱ्या नोकरापेक्षा जास्त खर्च करते.

दाव्यानुसार, मुलांची काळजी घेणाऱ्या किंवा घरकार करणाऱ्या नोकरांना हिंदुजा फक्त १० हजार ( १२० डॉलर) रुपये देत होते. शिवाय त्यांना रुपयांमध्ये बँक खात्यात पैसे दिले जात होते. नोकर हे भारतातील गरिब कुटुंबातून आणण्यात आले होते. नोकरांकडून १५ ते १६ तास काम करून घेतलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT