taiwan
taiwan 
ग्लोबल

Positive Story : मुंबईएवढ्या देशाने कोरोनाला रोखलं; आतापर्यंत फक्त 570 रुग्ण आणि 7 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तैपेई - अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी आणि तिसरी लाट आली आहे. युरोपात काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. दरम्यान, जगात असेही काही देश आहेत जिथं कोरोना नियंत्रणात आहे. यातच एक असा देश आहे जिथं गेल्या सहा महिन्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. चीनचा शेजारी देश असलेल्या तैवानने कोरोनाला आटोक्यात आणण्यात यश मिळवलं आहे.

चीनमधून जगभर पसरायला सुरुवात झालेल्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. असे असताना तैनवानमध्ये गेल्या 200 दिवसात म्हणजेच सहा महिने 20 दिवसांच्या कालावधीत एकही देशातील कोरोनाबाधित सापडलेला नाही. एका बाजुला अमेरिका, युरोप, भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहेत. मात्र तैवानमध्ये शेवटचा कोरोनाबाधित 12 एप्रिलला सापडला होता. 

लोकसंख्येच्या दृष्टीने तैवान हा महाऱाष्ट्राची राजधानी मुंबई इतकाच आहे. तैवानची लोकसंख्या जवळपास 2 कोटी 30 लाख इतकी आहे. याठिकाणी आतापर्यंत फक्त 550 कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला सीमा बंद केल्याने आणि देशांतर्गत प्रवासावर नजर ठेवल्यानं कोरोनाला रोखण्यात यश आलं. 

कोरोनावर निंयत्रण राखायचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं आहे. तैवानने याकडे कटाक्षाने लक्ष ठेवलं. तसंच टेक्नॉलॉजीचा वापर करून क्वारंटाइनचा नियम तयार केला होता. सर्वांसाठी मास्क बंधनकारक केला होता. तैवानने कोरोनाच्या आधी सार्सच्या साथीचा सामना केला होता आणि त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांनी अधिक काळजी घेतली. 

तैवानमध्ये आतापर्यंत जरी 7 जणांचा मृत्यू झाला असला तरी देशात 3 लाख 40 हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. क्वारंटाइनसाठी 14 दिवसांचा कालावधी होता. क्वांरटाइन करण्यात आलेल्यांपैकी एक हजारहून कमी लोकांना नियम तोडला. त्याबद्दल संबंधितांकडून दंडही वसूल करण्यात आला. नियम पाळणाऱ्या लोकांचे प्रमाण हे जवळपास 99.7 टक्के इतकं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT