Taliban 
ग्लोबल

Taliban : तालिबान्यांचा अजून एक प्रताप, गर्भनिरोधक गोळ्यांवर घातली बंदी! कारण वाचून हैराण व्हाल

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हापासून तालिबानी तेथील महिलांवर वेगवेगळे निर्बंध लावत आहेत. तालिबानने देशातील दोन प्रांतात गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सर्व औषध दुकानदारांना इशाराही देण्यात आला असून, हे पाश्चात्य देशांचे  षडयंत्र असल्याचे सांगितले जात आहे. मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे पाश्चात्य देशांचे षडयंत्र आहे. त्यामुळे तालिबानी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. 

मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर होत आहे, असे तालिबाण्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी घराघरात जाऊन या औषधांचा वापर करू नका म्हणून इशारा दिला आहे. दुकानदारांना देखील गंभीर इशारा दिला आहे. काबूल येथील एका दुकानदाराने या नवीन नियमाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

एका वृत्त संस्थेशी बोलताना स्थानिक दुकानदार म्हणाले, ते (तालिबानी) माझ्या दुकानवर दोन वेळा आले होते. त्यांनी मला गर्भनिरोधक औषधी न ठेवण्यासाठी धमकी दिली आहे. हे लोक काबूलमध्ये प्रत्येक दुकान तपासत आहेत. त्यामुळे औषधांचा जुना साठा विकायला देखील भीती वाटते. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रसार करायचा नाही. ह्या सर्व अफवा असल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील तालिबानकडून महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो राहुल द्रविड होता..! रोहित शर्माचा कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गौतम गंभीरवर थेट निशाणा; संघातील वाद चव्हाट्यावर?

Kartik Month Deepdaan: कार्तिक महिन्यात दीपदान का करावे? जाणून घ्या लाभ आणि कोणत्या वस्तूंचे दान करावे

Clutch Chess 2025 : विश्वनाथन आनंद विरुद्ध कास्पारोव; ३० वर्षांनंतर दोन दिग्गज पुन्हा आमनेसामने, विजेत्याला मिळणार 'इतक्या' लाखाचं बक्षीस

गौरी खानसाठी प्रचंड पजेसिव्ह होता शाहरुख, म्हणायचा...'केस मोकळे सोडायचे नाही' मुलगा आर्यन सुद्धा आईवर घालतो बंधनं

Latest Marathi News Live Update : सरन्यायाधीशांवरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला; कोल्हापुरात बार असोसिएशनमध्ये निषेध सभा

SCROLL FOR NEXT