Aryana Sayeed (Photo: Facebook/Aryana Sayeed)
ग्लोबल

पॉप स्टार आर्यना सईदने सांगितलं अफगाणिस्तानचं धक्कादायक वास्तव

काही दिवसातच जगाने अफगाणिस्तानला तालिबानच्या हातात कसं सोडून दिलं? याचं आश्चर्य वाटतं.

दीनानाथ परब

काबूल: "तालिबानने (Taliban) सरकार स्थापनेचा जो प्रस्ताव दिलाय, त्याला जगाने मान्यता देऊ नये. ते लोकांना खासकरुन महिलांना मानवीय वागणूक देत नाही" असे अफगाणि पॉप स्टार आर्यना सईदने (Aryana Sayeed) म्हटले आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली जाताच आर्यना सईदने देश सोडला. "२० वर्षापूर्वी आपण ज्या तालिबानचा अनुभव घेतला, ती माणस नव्हती. ते लोकांना मानवीय वागणूक देत नाही. खासकरुन महिलांना" असे आर्यना सईदने म्हटलय.

"काही दिवसातच जगाने अफगाणिस्तानला तालिबानच्या हातात कसं सोडून दिलं? याचं आश्चर्य वाटतं. महिलांना त्यांच्या जीवाची चिंता आहे. संपूर्ण अफगाणिस्तातून लोक काबुलमध्ये दाखल होत आहेत. त्यांना कुठेही आसरा नाहीय, अन्न नाहीय" अफगाणि जनतेची ही वेदनादायी स्थिती आर्यना सईदने जगासमोर मांडलीय. इंडिया टुडेला तिने ही माहिती दिली.

"अलीकडेच तालिबानने सरकार चालवण्यासाठी काही सुधारणा घडवण्याचे आश्वासन दिलेय. पण सरकारला जागतिक समुदायाकडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे" असे आर्यना सईद म्हणाली. "माझा तालिबानवर अजिबात विश्वास नाही. नवीन अफगाण सरकारला जगाकडून मान्यता मिळावी, त्यासाठी ते हे सर्व करत आहेत. जगाकडून त्यांना मान्यता मिळणार नाही" अशी अपेक्षा असल्याचे आर्यनाने सांगितले.

"मी अनेक वर्षांपासून तालिबानच्या निशाण्यावर आहे असे आर्यना सईद म्हणाली. अमेरिकन लष्कराच्या मदतीने १६ ऑगस्टला मी कशीबशी C-17 विमानातून निसटण्यात यशस्वी ठरले. आता मी वॉशिंग्टन डीसीमध्ये आहे. पण अजूनही माझं मन अफगाणि जनतेला होणाऱ्या यातनांमुळे दु:खी आहे" असे आर्यना सईदने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT