Afganistan 
ग्लोबल

तालिबानचा कंदहार, हेरातमधल्या भारतीय दूतावासावर छापा

नेमकं काय शोधण्याचा प्रयत्न केला त्यांनी?

दीनानाथ परब

नवी दिल्ली: तालिबानने कंदहार (kandahar) आणि हेरातमधल्या (herat) भारतीय दूतावासावर (indian consulate) छापा मारल्याचे वृत्त आहे. हे दोन्ही दुतावास भारताने सध्या बंद केले आहेत. तालिबानने (Taliban) या दोन्ही दुतावासामध्ये शिरुन कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला. ते या दोन्ही दुतावासात पार्क केलेल्या गाड्या घेऊन निघून गेलेत. कंदहार आणि हेरातमधल्या दुतावासातून तालिबानने काही गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याची गुप्तचरांची माहिती आहे.

जलालाबाद आणि काबुलमधल्या भारतीय दूतावासाबद्दल काही माहिती मिळालेली नाहीय. दुसऱ्या देशांच्या रिकाम्या दुतावासामध्ये प्रवेश करु नका तसेच तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना हात लावू नका, असे तालिबानी नेतृत्वाने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या फायटर्सना सांगितले होते. भारतीय दूतावासामध्ये शोध घेण्यात आला, यावरुन तालिबानच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानात भारताचे चार दूतावास आहेत. यात कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफचा दूतावास बंद आहे.

अफगाणिस्तानातून नागरिकांची सुटका करण्याची मोहिम सुरु असल्याने समन्वयासाठी काबूलचा दूतावासा सुरु ठेवलाय. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरु आहे. मंगळवारी 120 पेक्षा जास्त लोकांना इंडियन एअर फोर्सच्या सी-17 ग्लोबमास्टर विमानाने भारतात आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT