taliban Google
ग्लोबल

तालिबानकडून पहिला झटका, भारताबरोबर थांबवला व्यापार

अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: तालिबानने अफगाणिस्तानवर (Taliban afganistan) वर्चस्व मिळवल्यानंतर भारताबरोबरचा आयात-निर्यातीचा व्यापार (import-export trade) बंद केला आहे. तालिबानने रविवारी काबूलमध्ये (kabul) प्रवेश केला. त्यानंतर तिथली समीकरण बदलून गेली आहेत. तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक (cargo) बंद केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले.

"अफगाणिस्तानातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे. तिथून पाकिस्तानमार्गे सामान आपल्याकडे येते. तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आयात थांबली आहे" असे सहाय यांनी सांगितले. "खरंतर अफगाणिस्तानचे आपण सर्वात मोठे भागीदार आहोत.

वर्ष २०२१ मध्ये आपण अफगाणिस्तानला ८० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मालाची निर्यात केली. तिथून ५० कोटी पेक्षा जास्त मालाची आयात केली. व्यापाराशिवाय तिथे आपली मोठी गुंतवणूक आहे. अफगाणिस्तान आपण ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानात आपले ४०० प्रकल्प आहेत. त्यातले काही प्रकल्प सध्या सुरु आहेत" असे सहाय यांनी सांगितले.

व्यापारामध्ये भारताचे अफगाणिस्तान बरोबर चांगले संबंध आहेत. सध्या भारताकडून अफगाणिस्तानला साखर, औषध, चहा, कॉफी, कपडे, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवरची निर्यात होते. तिथून ड्राय फ्रुटस, कांदा आणि गमची आपण आयात करतो अशी माहिती FIEO च्या महासंचालकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT