ग्लोबल

महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र 'हिजाब'बाबत तडजोड नाही: तालिबान

सकाळ डिजिटल टीम

काबूल : अफगाणिस्तानात विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना त्यांचे शिक्षण पुढे सुरु ठेवता येईल, पदव्युत्तर शिक्षणही घेता येईल, असे स्पष्टीकरण तालिबान सरकारने आज दिले आहे. अर्थात, विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठीचे वर्ग वेगळे असतील आणि इस्लामिक पद्धतीचे कपडे घालणे अत्यावश्‍यक आहे, असे तालिबान सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने स्पष्ट केले आहे.

हक्कानी याने आज पत्रकार परिषद घेत शिक्षणाबाबत काही नवीन धोरणे जाहीर केली. तालिबानच्या आधीच्या सत्ताकाळात मुलींना आणि महिलांना शिक्षण घेण्यास बंदी होती. एवढेच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठीही त्यांच्यावर बंधने होती. आता मात्र, आपण बदललो असल्याचा दावा तालिबानने केला असून ते किती प्रमाणात बदलले आहेत, त्याकडे जगाचे लक्ष आहे. ‘आम्हाला पुन्हा आमचे घड्याळ वीस वर्षे मागे न्यायचे नाही. सध्या जे आहे, त्याचाच आधार घेऊन तालिबानला पुढे जायचे आहे,’ असे सांगत हक्कानी याने महिलांना शिक्षणाची परवानगी असल्याचे जाहीर केले. णाऱ्या महिलांविरोधात त्यांनी बळाचा वापर केला होता.

‘विद्यापीठात महिलांना उच्च शिक्षणही घेता येईल. मात्र, त्यांना हिजाब घालणे सक्तीचे असेल. विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या विषयांचाही आढावा घेतला जाईल,’ असे त्याने स्पष्ट केले. तालिबानच्या आधीच्या सत्तेवेळी त्यांनी संगीत आणि कला शिक्षणावर बंदी घातली होती. महिलांबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलला असल्याचा दावाही तालिबानने केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच समान हक्कांची मागणी करत मोर्चा काढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT