Taliban esakal file photo
ग्लोबल

तालिबानी घेताहेत लग्नासाठी १५ वर्षांवरील मुलींचा शोध!

अफगाणिस्तानमधून तालिबानच्या तावडीतून सुटलेल्या महिला पत्रकाराने तेथील महिलांच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.

वृत्तसंस्था

काबूल - अफगाणिस्तानमधून (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) तावडीतून सुटलेल्या महिला पत्रकाराने (Reporter) तेथील महिलांच्या (Women) परिस्थितीचे वर्णन केले आहे. तालिबानने देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी महिलांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. प्रत्येक घराची झडती घेत लग्नासाठी (Marriage) महिला व १५ वर्षांवरील मुलींचा शोध तालिबानी घेत आहेत, असे होली मॅकके यांनी म्हटले आहे.

मॅकके या ऑस्ट्रेलियन- अमेरिकन पत्रकार असून त्‍या अफगाणिस्तानमधून वार्तांकन करीत होत्या. तेथे तलिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर जीव वाचविण्‍यासाठी त्या देशातून बाहेर पडल्या. त्यानंतर मॅकके यांनी तालिबानी राजवटीचे वर्ण एका वृत्तपत्रातील लेखात केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, गेल्या आठवड्यात काबूल जिंकल्यानंतर तालिबानी देशभरातील प्रत्येक घराची झडती घेत आहेत. त्यांना लग्नासाठी महिला व १५ वर्षांवरील मुली हव्या आहेत. अफगाणिस्तानमधील महिलांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला आहे. तालिबानने या देशावर कब्जा मिळविल्यानंतर त्यांचे जीवन एका क्षणात बंदिस्त झाले. ‘मजार -ए-शरीफ सोडणे मला शक्य झाले, पण अफगाणिस्तानमधील माझ्या अनेक मैत्रिणी दहशतीच्या सावटाखाली आहेत. भविष्यात काय वाढून ठेवले, याची अनामिक भीती त्यांना वाटत आहे,’ असे त्या म्‍हणाल्या.

मॅकके यांनी गेल्या आठवड्यात काबूलजवळील विस्थापितांच्या छावणीत १४ वर्षांच्या मुलीची भेट घेतली होती. कंदुसमधील लढाईत तिला जीव वाचविण्यासाठी पळावे लागले होते. शिकून डॉक्टर होण्याची तिचे स्वप्न आहे.

अफगाणिस्तानमधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या फरिहा इसर यांनाही मॅकके या काही वर्षांपूर्वी भेटल्या होत्या. अफगाण महिलांच्या कथा-व्यथा उजेडात आणून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी इसर या देशभरात भ्रमंती करत असत. मात्र तालिबान्‍यांमुळे त्यांच्या ध्येयावरच घाला घातला आहे. ‘बाहेर राहणाऱ्या मैत्रिणी मी देश सोडावा, यासाठी विनवणी करीत आहेत. पण माझ्या भगिनी अडचणीत असताना मी तसे कसे करू शकते,’ असा उद्विगता त्या व्यक्त करीत असल्याचे लेखात म्हटले आहे.

फरिहा इसर यांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबान्यांनी अफगाणी महिलांवर जाचक निर्बंध तर लादले आहेच शिवाय लग्नासाठी मुलींचे अपहरणही करून लैंगिक शोषणही करण्यात येत आहे. यासाठी बडकशानमधील एक उदाहरण मॅकफे यांनी दिले आहे. हा शहराचा ताबा तालिबानने काही महिन्यांपूर्वीच घेतला आहे. तेथील २१ वर्षांच्या युवतीला घरातून नेण्यात आले. तालिबानी दहशतवाद्याने तिच्याशी लग्न केले. ज्या तालिबान्याने तिच्याशी लग्न केले, तिच्याशी लैंगिक संबंध ठेवायचाच, शिवाय चार तालिबानी दररोजरात्री तिच्यावर बलात्कार करतात, हे तिच्या वडिलांना समजले. या हतबल वडिलांचे गाऱ्हाणे ऐकूनही गव्हर्नरनेही कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली.

‘तालिबानी कधीच बदलणार नाहीत’

‘काहीही बदलले नाही. ते (तालिबान) म्हणतात, त्यांची वागणूक बदलली आहे, पण तसे झालेले नाही. तालिबानी बदलेले नाहीत आणि बदलणारही नाहीत. मानवी अधिकारांचे सातत्याने उल्लंघन करीत हिंसक, खुनशी हीच त्यांची ओळख आहे,’ असे सांगताना फरिहा इसर यांचा आवाज थरथरत होता, असे मॅकके यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT