TV Anchor Sakal
ग्लोबल

'बुरखा न घातल्यास कामावरून काढलं जाईल'; तालिबानची TV अँकरवर सक्ती

बुरखा घालण्यावरून तालिबानी महिलांना सरकारकडून बळजबरी करण्यात येत आहे.

दत्ता लवांडे

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना कमी कपडे घालण्यावर बंदी घातली होती. तसे आदेश दिल्यावर तेथील टीव्हीच्या वृत्तनिवेदक चेहरा झाकून समोर आल्या आहेत. दरम्यान तालिबानने शाळा कॉलेजमध्येही महिलांच्या कपडे घालण्यावर बंधने घातले आहेत. शरीराचा चेहरा सोडता कोणचाच भाग उघडा न ठेवण्याचे आदेश तालिबानी सरकारने दिले आहेत.

मागच्या वर्षी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून तालिबानने आपल्या नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. महिलांना कॉलेजमध्ये मोबाईल वापरापासून तर पुरूषांनी केस कापण्यापर्यंत निर्बंध घातले होते. दरम्यान या महिन्याच्या सुरूवातीला अफगाणिस्तानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी स्त्रियांनी घालण्याच्या कपड्यावर निर्बंध घातले होते. सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा झाकण्याचे आदेश तालिबानने दिले होते. या नियमांचं सर्वांनी पालन करावं यासाठी टीव्ही वृत्तनिवेदकांनाही बुरखा घालण्याचे आदेश दिले होते. पण निवेदकांनी त्या नियमाचे पालन न केल्याने त्यांना पुन्हा निर्देश देण्यात आले होते.

तालिबानने पुन्हा आदेश दिल्यावर पुर्ण हिजाब आणि बुरखा घालून महिला निवेदकांनी सकाळच्या बातम्यांचे बुलेटीन प्रसारित केले आहे. दरम्यान निवेदनकर्त्या सोनिया नियाझी यांनी सांगितलं की, "आम्ही या निर्णयाच्या विरोधात होतो, पण आम्हाला बळजबरी करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की, चेहरा झाकल्याशिवाय महिला कार्यकर्त्यांना हे काम करू दिलं जाणार नाही किंवा काढून टाकलं जाईल." असं सांगत महिलांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान तालिबानी मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, "महिलांना या कामातून काढण्याचा आमचा हेतू नसून त्यांनी फक्त नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. माध्यमांनी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल आम्ही आनंदी आहेत." असं प्रवक्ते अकिफ मोहाजीर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT