afghanistan 
ग्लोबल

अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ; गोळीबारात 7 कामगारांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

काबुल : अफगाणिस्तानातील पूर्व भागामध्ये बंदूकधाऱ्यांच्या एका समूहाने कमीतकमी सात अफगाणी कामगारांची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे. याशिवाय केलेल्या बॉम्बस्फोटात एका महिला डॉक्टरचा देखील मृत्यू झाला आहे. या डॉक्टरच्या वाहनामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता.

नंगरहारमध्ये प्लास्टिक कारखान्यात नरसंहार
नंगरहार प्रांताच्या पोलिस प्रमुख जनरल जुमा गुल हेमट यांनी म्हटलं की, सोर्ख रॉड जिल्ह्यातील प्लास्टर कारखान्यातील कामगार या गोळीबारामध्ये मृत्युमूखी पडले आहेत.पोलिसांनी या घटनेसंदर्भात चार संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांचे प्रवक्ते फरीद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कामगार अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे  होते. काही लोक काबुलची राजधानी तसेच मध्य बामियान आणि उत्तर बल्ख प्रांतातून कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आले होते.

इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी
इस्लामिक स्टेट समूहाने एक वक्तव्य जाहीर करत या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी म्हटलंय की त्यांच्या दहशतवाद्यांनी एका महिलेच्या वाहनामध्ये बॉम्बचा स्फोट केला. या वक्तव्यात असा दावा केलाय की या महिलेने पूर्व भागातील नंगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमध्ये अफगान गुप्तचर सेवेसाठी काम केलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT