Rape Crime news Sakal
ग्लोबल

बलात्काऱ्यांचे लैंगिक खच्चीकरण; या देशात लवकरच कायदा

सकाळ डिजिटल टीम

लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा असलेला कायदा मंजूर करण्याच्या दिशेने थायलंडने मंगळवारी एक पाऊल पुढे टाकले. थायलंडमधील 145 सिनेटर्सनी या विधेयकाला पाठिंबा दिला असून या विधेयकांतर्गत गुन्हेगाराचे रसायनांचा वापर करुन लैंगिक खच्चीकरण केले जाणार आहे. (Thailand govt passes bill that allows voluntary chemical castration of sex offenders)

थायलंडमध्ये २०१३ ते २०२० या कालावधीत बलात्कारप्रकरणी तुरुंगवास झालेले १६, ४१३ दोषी शिक्षा भोगून बाहेर आले. यातील ४,८४८ नराधमांना लैंगिक अत्याचारप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली. अशी विकृत मानसिकता असलेल्या नराधमांविरोधात थायलंडमध्ये कठोर शिक्षा असलेले विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला कनिष्ठ सभागृहाने फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली होती. मंगळवारी या विधेयकाला थायलंडच्या सिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे.

या विधेयकांतर्गत, दोषीचे रसायनांचा वापर करत लैंगिक खच्चीकरण केले जाईल. मनोविकार तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसेच संबंधित दोषी व्यक्तीच्या संमतीनेच ही रसायने दिली जातील. जे या पर्यायास संमती देतील, त्यांना टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यासाठी इंजेक्शन दिले जातील. त्या बदल्यात त्यांची तुरुंगवासाची मुदत कमी केली जाईल. मंत्रिमंडळाकडून ठरविल्या जाणार्‍या तारखेला रॉयल गॅझेटमध्ये प्रकाशित केल्यावर हे विधेयक कायद्यात रुपांतरीत होईल.

इतर अनेक देशांनीही निवडलाय हा पर्याय

रसायनांचा वापर करत लैंगिक खच्चीकरण करणे हा शिक्षेचा नवीन प्रकार नाहीये. इंडोनेशिया, अमेरिका, पोलंड, रशिया, मोल्डाविया, इस्टोनिया, युक्रेन, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, कझाकस्तान, नॉर्वे, स्वीडन या देशांत या पद्धतीला मान्यता दिली गेली आहे. मात्र, अशा स्वरुपाच्या शिक्षेमुळे लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होतील का, अशी शंकाही तज्ज्ञ उपस्थित करतात.

तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मते, लैंगिक खच्चीकरणाच्या शिक्षेमुळे लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होतील. मात्र काहींच्या मते, यासाठी दिल्या जाणाऱ्या रसायनांमुळे माणूस अधिक हिंसक होऊ शकतो. एखादा व्यक्ती मुलींचा तिरस्कार करू शकतो. अतिरागामुळे अशा पुरुषांकडून मुलींना त्रास दिला जाण्याची शक्यता देखील आहे. शिवाय, लैंगिक संभोग हा हिंसाचाराचा एकमेव प्रकार नाही, जे गुन्हेगार स्त्रीयांवर हिंसाचार करतात ते हिंसाचाराच्या इतर पद्धती देखील वापरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT