thailand 
ग्लोबल

Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू

माजी पोलीस कर्मचाऱ्यांनं हा गोळीबार केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Thailand mass shooting: थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. (Thailand mass shooting at day care center 34 people died including more children)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ईशान्य प्रातांत ही घटना घडली आहे. लहान मुलांना सांभाळण्यासाठी असलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये हा गोळीबार झाला असून यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्यानं हा गोळीबार केला असून नंतर त्यानं स्वतःवर देखील गोळी झाडली.

या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ज्या चिमुकल्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यांचे पालक टाहो फोडताना दिसत आहेत. काही लोक हे जखमींना रुग्णवाहिकेतून नेत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीस हल्लेखोराकडे पाहताना दिसत आहेत.

हल्लेखोर कोण आहे?

लहान मुलांवर अमानुषपणे गोळीबार करणारा हल्लेखोर हा एक माजी पोलीस अधिकारी आहे. पंतप्रधान जनरल प्रयुत चॅन-ओचा यांनी या नर्सरीत अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याला शोधण्याचे नुकतेच आदेश दिले आहेत.

थायलंडमध्ये सर्वाधिक परवानाधारक

इतर देशांच्या तुलनेत थायलंडमध्ये परवानाधारक बंदुकधारकांची संख्या जास्त असतानाही अशा प्रकारे गोळीबाराच्या घटना खूप कमी वेळा घडल्या आहेत. पण या बेकायदा शत्र वापरणं इथं सर्वसामान्य बाब आहे. यापूर्वी सन 2020 मध्येही असाच गोळीबार झाला होता. यामध्ये संतापलेल्या सैनिकानं अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT