Princess of Wales 
ग्लोबल

Princess of Wales: प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरिन यांना कँसर; व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:च दिली माहिती

प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरिन (Catherine, Princess of Wales) यांना कँसर झाला आहे. कॅथरिन यांनी स्वत: याची माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

लंडन- प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरिन (Catherine, Princess of Wales) यांना कँसर झाला आहे. कॅथरिन यांनी स्वत: याची माहिती दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात सांगितलंय की, त्यांना कँसर झाला असून त्यांच्यावर सुरुवातीच्या टप्प्यातील उपचार (chemotherapy treatment) सुरु आहेत. 'द गार्डियन'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (The Princess of Wales Catherine has disclosed that she has been diagnosed with cancer)

विंडसर कॅस्टलच्या गार्डनमधील व्हिडिओमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांच्यावर जानेवारी महिन्यामध्ये सर्जरी झाली होती. यादरम्यान त्यांना कँसर झाल्याचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून कॅथरिन यांच्यासंबंधात अनेक अफवा पसरत होत्या. त्यानंतर कॅथरिन यांनी समोर येऊन आपल्या आजाराची माहिती दिली आहे. या बातमीमुळे ब्रिटनच्या जनतेला धक्का बसला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याप्रकरणी दु:ख व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. कॅथरिन म्हणाल्या की, माझ्यासाठी आणि माझ्या पतीसाठी हा मोठा धक्का होता. पण, आमच्या तीन मुलांना हे समजावणं खूप मोठं आव्हान होतं. जॉर्ज (वय १०), चार्लोट (वय ८) आणि लुईस (वय ५) यांना माझ्या आजाराबाबत सांगण कठीण होतं.

आमच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता. विलियम आणि मी आमच्या मुलांना समजवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. या कठीण प्रसंगामध्ये आम्ही आमचा खासगीपणा ठेवू इच्छितो. जानेवारी महिन्यात सर्जरी झाल्यामुळे तो आजार बराहोईपर्यंत उपचार सुरु केले नव्हते, असं कॅथरिन म्हणाल्या आहेत. ब्रिटन आणि जगभरातून अनेक नेते कॅथरिन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्या बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.

विशेष म्हणजे किंग चार्ल्स (वय ७५) यांना जेव्हा कँसरचे निदान झाले होते, त्याच दरम्यान कॅथरिन यांना निदान झाले आहे. किंग चार्ल्स यांनी आपल्या सूनेच्या धाडसाचे कौकुक केले आहे. हॉस्पिटलमध्ये या दोघांचे एकाच वेळी उपचार सुरु होते. किंग चार्ल्स हे गेल्या काही आठवड्यात कॅथरिन यांच्या संपर्कात राहिले आहेत. अशा कठीण प्रसंगी आणि कुटुंबासोबत आहोत, असं ते म्हणाल्याचं कळतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT