Ned Price vs Nupur Sharma esakal
ग्लोबल

मोहम्मद पैगंबरांसाठी अमेरिकाही सरसावली; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा केला निषेध

सकाळ डिजिटल टीम

'भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा आम्ही निषेध करतो.'

प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिकाही (America) सामील झालीय. गुरुवारी अमेरिकेनं भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दोन अधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. त्याचबरोबर अमेरिकेनं याप्रकरणी भाजपच्या कारवाईचंही कौतुक केलंय. विशेष म्हणजे, याआधी अनेक अरब देशांनी पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवलाय.

यूएस स्टेट डिपार्टमेंटचे (US State Department) प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) म्हणाले, "भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांचा आम्ही निषेध करतो. पक्षानं त्या विधानांचा जाहीर निषेध केल्याचं पाहून आम्हाला आनंद होत आहे. आम्ही नियमितपणे भारत सरकारशी मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो. भारताला मानवाधिकारांबद्दलचा आदर वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत असतो."

काय होतं प्रकरण

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी 26 मे रोजी प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केली होती. अनेक इस्लामिक देशांनी यावर नाराजी व्यक्त केली. यामध्ये अनेक देश होते, ज्यांचे भारताशी संबंध जवळचे मानले जातात. अमेरिकेपूर्वी कतार, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांनी पैगंबरावरील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय. सध्या शर्माला भारतातही पोलिस कारवाईला सामोरं जावं लागतंय. त्यांच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT