Sarkari Naukri esakal
ग्लोबल

World Economic Forum : पुढच्या पाच वर्षांत भारतातल्या नोकऱ्यांमध्ये २२ टक्के वाढ; सर्वेक्षणातून आलं समोर

आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अशा क्षेत्रांना भविष्यात जास्त स्कोप असणार आहे.

वैष्णवी कारंजकर

आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सेगमेंट्समध्ये होणारी प्रगती, आणि त्यामुळे भारतातल्या नोकऱ्यांमध्ये पुढच्या पाच वर्षांत २२ टक्केपेक्षा जास्त वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका अभ्यासातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे.

जागतिक स्तरावर नोकऱ्यांमध्ये २३ टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत जगभरात ६९ मिलियन नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने वर्तवला आहे. WEF कडून भविष्यातल्या नोकऱ्यांच्या संधींबद्दल एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात ८०३ कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये ११.३ मिलियनहून अधिक कर्मचारी, २७ उद्योग समूह आणि ४५ अर्थव्यवस्थांचा या सर्वेक्षणात समावेश आहे.

अहवाल तयार करण्यासाठी साधारणपणे ८०३ कंपन्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये ६७३ मिलियन नोकऱ्यांपैकी ८३ मिलियन नोकऱ्या जातील तर ६९ मिलियन नव्या संधी निर्माण होतील, असं अहवालात म्हटलं आहे.

भारताच्या संदर्भात ६१ टक्के कंपन्यांना असं वाटतं की पर्यावरण, समाज व प्रशासन याबद्दलच्या मानकांमुळे नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होईल. तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि डिजिटल ग्रोथमुळे जवळपास ५९ टक्के नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील, असं अंदाज आहे.

भारतात प्रामुख्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांमध्ये तसंच डाटा अॅनलिस्ट आणि सायन्टिस्ट या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील. जागतिक स्तरावर पाहता, प्रतिभाशाली मनुष्यबळाच्या तुलनेत चीन आणि भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या अर्थव्यवस्था अधिक सक्षम असल्याचं आढळून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT