There will be no delay in supply of
There will be no delay in supply of  
ग्लोबल

भारतासोबत जे ठरलंय तेच होईल! 'राफेल डील'संदर्भात फ्रान्सकडून स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संरक्षण दलाची क्षमता वाढवणारे 'राफेल' हे लढाऊ विमान लवकरच भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. 'राफेल' लढाऊ विमानांच्या पुरवठ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेतच सर्व विमानांचे हस्तांतर करणार असल्याचे फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी म्हटले आहे. 2016 मध्ये भारत सरकारने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमाने खरेदी करण्याबद्दल करार केला होता. या करारानुसारच फ्रान्स येत्या दोन वर्षात 'राफेल' विमाने भारताला सुपूर्त करणार आहे. 
भारतीय वायू सेनेची क्षमता वाढविण्यासाठी भारत सरकारने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीशी 58 हजार कोटी रुपयांचा करार करत 36 'राफेल' लढाऊ विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. भारतीय वायू सेनेतील 'राफेल' विमानांच्या समावेशामुळे  भारतीय संरक्षण दलाचे पारडे अधिकच मजबूत होणार आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारानुसार फ्रान्सने 2019 मध्ये भारताला पहिल्या विमानाचे हस्तांतर केले होते. यानंतर 'राफेल' विमानांची पुढील खेप ठरलेल्या वेळापत्रकानुसारच लवकरात लवकर सोपविण्यात येणार असल्याचे  फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी म्हटले आहे. यासंबंधात पुढे बोलताना, भारतीय वायुसेनेला पहिल्या चार राफेल विमानांची खेप शक्य तितक्या लवकर देणार असल्याने, करारामध्ये करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे पालन होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फ्रान्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे याचा परिणाम भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या 'राफेल' विमानांच्या करारावर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फ्रान्स मध्ये 28 हजार 370 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. तर जवळ जवळ 2 लाख जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

त्यामुळेच विमानांच्या वितरणाविषयी व्यक्त करण्यात येत असलेली भीती अनावश्यक असल्याचे सांगत, इमॅन्युएल लेनेन यांनी ठरलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करत सर्व विमानांची पूर्तता करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मागील वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत फ्रान्स मध्ये भारताला पहिले 'राफेल' विमान सोपविण्यात आले होते. तर पुढील दोन वर्षात भारताला सर्वच्या सर्व 36 विमाने मिळणार आहे. त्यांच्या दोन स्वतंत्र्य स्क्वाड्रन करण्यात येणार असून, पंजाब सीमेवर अंबाला आणि पश्चिम बंगाल येथील हाशिमारा येथे तैनात करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT