us protest 
ग्लोबल

America: आशियाई लोकांवरील हल्ल्याच्या निषेधात हजारो नागरिक रस्त्यावर

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- आशियाई-अमेरिकी नागरिकांविरोधात वाढलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये शनिवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत आशियाई वंशांच्या व्यक्तींवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. वंशवाद आणि वर्णभेदाबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी हे आंदोनल करण्यात आले होते. 16 मार्चला तीन मसाज पार्लवर एका माथेफिरुने हल्ला केला होता. या हल्ल्यात 6 आशियाई वंशांच्या महिलांसह 8 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीने वर्णवादाच्या मुद्द्यावरुन हा हल्ला केला होता. या घटनेचा निषेध म्हणून हजारो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले होते. देशातील अनेक ठिकाणी रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

एका अभ्यासानुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोना विषाणूला 'चिनी विषाणू' म्हणून हिनवलं होतं. तेव्हापासून लोकांनी मोठ्या प्रमाणात आशियाई लोकांविरोधात ट्विटरवर हॅशटॅग वापरायला सुरुवात केल्याचं सांगण्यात आलंय. शनिवारच्या निदर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशय मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या रँलींमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांनी भाग घेतल्याचं सांगण्यात आलंय.  Stop AAPI Hate च्या रिपोर्टनुसार मार्च 2020 ते एप्रिल 2021 पर्यंत देशात आशियाई-अमेरिकी नागरिकांसंदर्भात 3,800 वर्णभेदी तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

नॅशनल काऊंसिंल ऑफ एशियन पॅसिफिक-अमेरिकन्स संघटनेने शनिवारी एक व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात आशियाई-अमेरिकी महिलांवर अटलांमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यात आला. राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी यासंर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सरकार आशियाई-अमेरिकी लोकांच्या सोबत उभे आहे. शिवाय यांच्याविरोधातील कोणत्याही हिंसेला थारा दिला जाणार नाही. अमेरिकेत द्वेषाला स्थान नाही. ते थांबायला हवे आणि आपण सर्वजण मिळून ते थांबवू, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईट यांचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत संतापाची लाट पसरली. जॉर्ज फ्लॉईड यांची हत्या वर्णद्वेषातून झाली असल्याचा आरोप झाला होता. त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून हजारो लोक रस्त्यावर उतरले. अनेक दिवस अमेरिकेतील अनेक राज्यात हे आंदोलन सुरु होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळल लागले होते. याचे पडसाद जागतिक पातळीवरही उमटले. अनेकांनी आपापल्या देशात निदर्शने करत जॉर्ड फ्लॉईड यांच्या हत्येचा निषेध केला. अमेरिकेत वर्णवाद विरोधातील आंदोलनाचा जुना इतिहास आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT