petrol diesel
petrol diesel 
ग्लोबल

पेट्रोल 100 ने घेताय पण काही देशात 2 ते 10 रुपयांना मिळतंय; जाणून घ्या कुठं

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात भारतात पेट्रोलच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. डिझेलचे दरही 85 रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांमध्ये संताप आहे. इंधनाचे दर केंद्र सरकारने कमी करावे, अशी मागणी सर्वसामान्यांची आहे. असे असले तरी जगात असे काही देश आहेत जेथे पेट्रोलच्या किंमती 2 रुपये, 4 रुपये किंवा 10 रुपये प्रती लिटर आहे. जाणून घेऊया ते देश कोणते आहेत.

वेनेझुएलामध्ये पेट्रोलच्या किंमती दीड रुपये

जगभरातील देशांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सांगणारी वेबसाईट  globalpetrolprices.com च्या माहितीनुसार, लॅटिन अमेरिकेतील देश वेनेझुएलामध्ये 22 फेब्रुवारीला पेट्रोलचे दर भारतीय रुपयांनुसार 1 रुपये 45 पैशाच्या आसपास होते. 

इराणमध्ये 4 रुपये लिटर आहे पेट्रोल

स्वस्त पेट्रोल विकण्यामध्ये वेनेझुएलानंतर इराणचा नंबर लागतो. इराणमध्ये पेट्रोलच्या किंमती 4 रुपये 39 पैसे आहेत. इराण, वेनेझुएलामध्ये क्रूड ऑईल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या देशातील इंधनाचे दर कमी आहेत. 

सर्वात स्वत पेट्रोल विकणारे टॉप टेन देश

वेनेझुएला (1.45 रुपये) आणि इराणनंतर (4.39 रुपये) अंगोला असा देश आहे, जेथे पेट्रोल 17.17 रुपये प्रती लीटर विकले जाते. यानंतर अल्जीरिया (25.032 रुपये), कुवैत (25.133 रुपये), सूडान (27.407 रुपये), कजाखस्तान (29.657 रुपये), कतार (29.825 रुपये), तुर्कमेनिस्तान (31.084 रुपये), नाइजीरिया (31.568 रुपये) या देशांचा क्रमांक लागतो. 

भारताच्या शेजारी देशातही पेट्रोल आहे स्वस्त

भारताच्या शेजारी देशांमध्येही पेट्रोल स्वस्त दरात विकले जात आहे. विशेष म्हणजे आर्थिक समस्यांशी झगडणाऱ्या नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तानमध्येही पेट्रोलच्या किंमती कमी आहेत. चीनमध्ये पेट्रोलच्या किंमती 77.02 रुपये आहेत, पाकिस्तानमध्ये 51.119 रुपये प्रती लिटर पेट्रोल विकले जात आहे. श्रीलंकेत पेट्रोलच्या किंमती 60.45 रुपये आहेत, नेपाळमध्ये 69.054 रुपये प्रती लीटरनी पेट्रोल विकले जात आहे. भूतानमध्ये पेट्रोलची किंमत 49.564 आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT