Transgender Man Gave Birth google
ग्लोबल

ट्रान्सजेंडर पुरूषाने दिला मुलाला जन्म! आई म्हटल्याने आला राग

बेनेट सांगतो की मातृत्वाच्या दृष्टीने स्त्रीत्वाची व्याख्या करणे थांबवले पाहिजे. म्हणूनच नर्सने त्याला आई म्हटल्यावर त्याला राग आला होता.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या ट्रान्सजेंडरने पुरूषाने मुलाला जन्म दिला आहे. त्यानेच याविषी माहिती दिली. त्याचे नाव बेनेट कास्पर विल्यम्स आहे. तो म्हणाला मी जरी आई असलो तरी मला आई (Mother) म्हणणं मात्र आवडलं नाहीये. बेनेट गर्भवती (Pregnancy) असताना हॉस्पिटलच्या नर्सेस त्याला आई म्हणून बोलावायच्या. यामुळे तो नाराज झाला होता.

लग्नाआधीच मुलाची इच्छा

बेनेट २० वर्षांचा असताना त्याच्यात बदलांना सुरूवात झाली, तेव्हा त्याला आपण ट्रान्सजेंडर असल्याचे लक्षात आलं. २०१७ साली त्याची भेट मलिकबरोबर झाली. त्यांनी २०१९ साली लग्न केले. लग्नानंतर आपलं स्वत:च अपत्य हवं असं त्यांना वाटलं. दोघांनी निर्णय घेतला आणि बेनेट मुलाला जन्म देऊ शकतो असे ठरले. मूल जन्माला येण्यासाठी जे पर्याय आहेत त्याचा दोघांनी शोध घेतला. बेनेटला यासाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोन थेरपी थांबवावी लागली. त्याच्या अंडाशयांना कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेली ही थेरपी तो गेल्या अनेक वर्षांपासून करत होता.

बेनेटने २०१५ साली मध्ये शस्त्रक्रिया करून त्याचे स्तन काढले होते. त्यासाठी त्याला ३ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त खर्च झाला. पण त्याच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळेच मुलाला जन्म देण्यासाठी सक्षम असल्याने त्याने तसा निर्णय घेतला. त्यानंतर बेनेटला गर्भधारणा झाली. सिझेरियन सेक्शनद्वारे त्याने मुलाला जन्म दिला. त्यांनी मुलाचे नाव हटसन ठेवले असून तो आता दीड वर्षांचा आहे. तर, शस्त्रक्रियेविषयी बेनेट म्हणाला की, त्याला स्तनांबद्दल खूप दु:ख होतं, म्हणून स्तन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. शरीराचे काही भाग काढल्यानंतर मला कधीच वाईट वाटले नाही. बेनेट सांगतो की मातृत्वाच्या दृष्टीने स्त्रीत्वाची व्याख्या करणे थांबवले पाहिजे. म्हणूनच नर्सने त्याला आई म्हटल्यावर त्याला राग आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT