Elon Musk vs Parag Agarwal esakal
ग्लोबल

Twitter Deal : ..तर Elon Musk ला पराग अग्रवालांना द्यावे लागणार 346 कोटी; जाणून घ्या का?

मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केलीय.

सकाळ डिजिटल टीम

मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केलीय.

Elon Musk Twitter Deal : 'ट्विटर'चे मालक बनताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी मोठी कारवाई केलीय. या संपूर्ण 'डील'वर नजर ठेवणाऱ्या व्यक्तीनुसार इलॉन मस्क यांनी ट्विटरची (Twitter) कमान हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांची हकालपट्टी केलीय.

मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाहीय. परंतु, जर पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकलं तर ट्विटरला त्यांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.

इलॉन मस्क पराग अग्रवाल यांना 'इतके' पैसे देणार?

जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या कंपनीचा सीईओ बनते, तेव्हा पगाराव्यतिरिक्त त्याला कंपनीचे काही शेअर्सही दिले जातात. अशा परिस्थितीत जर इलॉन मस्कनं पराग अग्रवाल यांना ट्विटरवरून हटवलं, तर त्यांचे सर्व शेअर्स कंपनीला द्यावे लागतील. रॉयटर्सच्या मते, पराग अग्रवाल यांना सुमारे 42 मिलियन डॉलर म्हणजेच 346 कोटी रुपये द्यावे लागतील. मस्क ट्विटरचा मालक झाल्यानंतर पराग अग्रवाल यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. यात ट्रस्टच्या प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि 2012 पासून ट्विटरचे सल्लागार असलेल्या सीन एडगेट यांनाही काढून टाकण्यात आलंय.

मस्कनं बदलला आपला प्रोफाइल बायो

त्याचवेळेस इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर खात्याच्या प्रोफाइलचा बायो बदलला आहे. तिथं त्यांनी स्वत:ला चीफ ट्विट लिहिलं आहे. यातून मस्क ट्विटर विकत घेत असल्याचं स्पष्ट झालं होतं. तुमच्या माहितीसाठी इलॉन मस्कनं ट्विटरची खरेदी 44 अब्ज डॉलरमध्ये करण्याचं आश्वासन दिलं होतं.

ट्रम्प पुन्हा ट्विटरवर सक्रिय होणार?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह लाखो लोकांची ट्विटर खाती वेगवेगळ्या कारणांमुळं बंद करण्यात आली आहेत. ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी घालण्यानंतर मस्क यांनी जाहीरपणे टीका केली होती. अशा परिस्थितीत आता ट्वम्प पुन्हा ट्विट करू शकणार का हे पाहावं लागणार आहे. 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेणारा मस्क येत्या काळात या सोशल मीडिया साइटवर काय बदल करणार हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

Velhe News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सहकाऱ्यांसह राजगडावर श्रमदान

SCROLL FOR NEXT