Twitter down again 
ग्लोबल

Twitter Down : जगभरातील यूजर्संकडून सोशल मीडियावर तक्रार

ट्विटरचा वापर करताना त्यांचे अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ट्विटरचा वापर करताना त्यांचे अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये ट्विटरची सेवा एका आठवड्यात दोन वेळा ठप्प झाली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरची सेवा ठप्प झाली आहे. यासंबंधित अनेक यूजर्संनी सोशल मीडियावर याची तक्रार केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ट्विटर अॅक्सेस करण्यात आणि ट्विट पाहण्यासही अनेक अडचण येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Twitter down again)

युजर्सनी सोशल मीडियावर ट्विट पाहण्यात अडचण येत असल्याची तक्ररा ट्वीट करत केली आहे. यासोबत सोशल मीडियावर #TwitterDown सुद्धा ट्रेंड सुरू आहे. ट्विटरने यासंबंधी सांगितले की, ही सेवा लवकरच सुरळीत केली जाणार आहे. मात्र साईट बंद असल्याने युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर ट्विटरची सेवा ठप्प होण्याची माहिती सांगताना यूजर्सने म्हटलंय की, ओव्हर कॅपिसिटीचे एरर दिसत आहे. त्यामुळे आपोआप लॉगआउट होत आहे. अकाउंट तसेच कोणतेही ट्विटही दिसत नाही. तसेच ट्विट करण्यात अडचणी येत आहेत. ट्विटरचा वापर करताना त्यांचे अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.

दरम्यान, ट्विटरची सेवा ठप्प झाल्याने हजोरो लोकांनी याची तक्रार केली आहे. यूजर्स ट्विटरचा वापर करू शकत नाहीत. यूजर्संना ट्विटर लॉग इन करणे आणि ट्विट करण्यात अडचण येत आहे. या दरम्यान ट्विटर ने ट्विट करून ही माहिती दिली आहे की, ज्यांना ट्विटर अॅक्सेस करण्यात अडचण येत आहे. यावर काम केले जात आहे. लवकरच ही सेवा पूर्वपदावर येईल, असे ट्विटरकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

SCROLL FOR NEXT