Twitter Blue Tick charge eight dollars per month 
ग्लोबल

Twitter : ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार दरमहा आठ डॉलर

शुल्क आकारणी रद्द होणार नाही, मस्क यांचे ठाम मत

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : ट्विटरवरील ब्ल्यू टिकसाठी आता महिन्याला आठ डॉलर म्हणजे अंदाजे ६५० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी नुकतीच ही घोषणा केली. त्यामुळे वापरकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर टीकेची झोड उठली. त्याला उत्तर देताना मस्क यांनी, ‘कितीही तक्रार करा;आठ डॉलर शुल्क मोजावेच लागेल,’ असे स्पष्ट केले आहे.

मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ब्ल्यू टिकसाठी वीस डॉलर शुल्क आकारले जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावरून ट्विटरच्या वापरकर्त्यांमध्ये खळबळ माजली होती.

सध्या ब्ल्यू टिक सेवा मोफत असून, अनेक उच्चपदस्थ लोक याचा वापर करतात. ही विशेष सेवा असून निवडक लोकांनाच मिळते. कंपनीने २००९मध्ये ब्ल्यू टिक ही विशेष सेवा आणली होती. खोट्या अकाउंटना आळा घालण्यासाठी कंपनी पुरेसे उपाय करत नाही, असा आरोप झाल्यावर ट्विटरने ही उपाययोजना केली होती.

‘आठ डॉलरमध्ये ब्ल्यू टिक. लोक अधिक सशक्त होणार,’ असे ट्वीट मस्क यांनी मंगळवारी केले. पैसे देणाऱ्या व्यक्तींना रिप्लाय व सर्चमध्ये फायदा होईल. तसेच फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी हे उपाय आहेत, असे मस्क यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Tourism Expo : पर्यटनाचे अनेक पर्याय एकाच छताखाली; ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला पुण्यात आजपासून प्रारंभ

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची निवड

School Bus : ‘विद्यार्थी वाहतूक नियमावली’ कागदावरच! परिवहनमंत्र्यांनी सूचना देऊन वर्ष उलटले, तरी अहवाल गुलदस्तात

ZP Election : निवडणुकीसाठी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ; २३ हजार जणांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT