ग्लोबल

पाकिस्तानमध्ये दोन चीनी नागरिकांवर भरदिवसा झाडल्या गोळ्या

विनायक होगाडे

कराची : पाकिस्तानातील कराचीमध्ये दोन चीनी नागरिकांची गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मास्क घालून मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी या चीनी नागरिकांवर बुधवारी गोळ्या झाडल्या. सध्या या दोन्ही चीनी नागरिकांना कराचीमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याआधी मागे 14 जुलै रोजी खैबर पख्तूनख्तामधील अप्पर कोहकिस्तानमधील दासू धरणाच्या जागी चीनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला झाल्ला झाला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी ही घटना घडली आहे. या घटनेत कमीतकमी नऊ चिनी नागरिक ठार झाले होते. याबाबतचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

या घटनेवर बोलताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटलंय की, या घटनेकडे "एक स्वतंत्र प्रकरण" म्हणून पाहिलं पाहिजे. पाकिस्तानमधील चीनी नागरिक आणि पाकिस्तानमधील मालमत्तांचे संरक्षणाबाबत पाकिस्तावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

यावर्षी एप्रिलमध्ये, नैऋत्य पाकिस्तानमधील क्वेटा येथे चिनी राजदूतांच्या एका मोठ्या हॉटेलमधील कार्यक्रमात बॉम्ब स्फोट झाला होता, त्यात चार लोक ठार झाले होते. चीन हा पाकिस्तानचा जवळचा सहयोगी मित्र आहे आणि मोठा गुंतवणूकदार देखील आहे. पाकिस्तानी सैन्यात प्रत्येकी १५,००० सैन्य असणारी दोन विशेष सुरक्षा विभाग तयार करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात चीनचे पैसे खर्च केले गेले आहेत, अशीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT