Two Ethiopian Airlines pilots fell asleep while flying plane cruising at 37000 feet esakal
ग्लोबल

Plane Landing : दोन्ही पायलट झोपले लँडिंग करायचंच विसरले!

अनिरुद्ध संकपाळ

Plane Landing Pilot Sleep : दोन इथोपियन एअरलाईनचे वैमानिक सुदानच्या खारतोऊम ते इथोपियाची राजधानी आदिस अबाबा उड्डाणादरम्यानच झोपी गेले, त्यामुळे त्यांनी लँडिंग मिस केले. हा संपूर्ण प्रकार सोमवारी झाल्याचे हेराल्ड एव्हिएशनने सांगितले. ज्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलला फ्लाईट क्रमांक इटी 343 विमानतळाकडे येत असल्याचे दिसले. मात्र ते लँडिंगच्या दृष्टीकोणातून ते कोणतीच हालचाल करताना दिसत नव्हते. दरम्यान, बोईंग 737 विमान ऑटोपायलट मोडला टाकून दोन्ही वैमानिक झोपी गेले होते. त्यांनी विमान 37 हजार फुटावर ठेवले होते. (Two Ethiopian Airlines pilots fell asleep while flying plane cruising at 37000 feet)

झोपी गेलेल्या वैमानिकांशी एअर ट्रॅफिक कंट्रोलने संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात काही यश आले नाही. विमान विमानतळावर लँड होण्याऐवजी ते पुढे निघून गेले. दरम्यान, ऑटो पायलट मोड डिसकनेक्ट झाला आणि विमानात आलार्म वाजण्यास सुरूवात झाली. त्यानंतर झोपी गेलेले वैमानिक खडबडून जागे झाले. त्यानंतर या वैमानिकांनी पुन्हा विमानाचा ताबा घेऊन जवळपास 25 मिनिटांनी धावपट्टीवर विमान लँड केले. नशिबाने विमानातील कोणालाही धोका पोहचला नाही आणि विमान सुरक्षितरित्या लँड झाले.

सर्वेलन्स सिस्टमच्या डाटावरून विमान धावपट्टीवरून लँड न होताच पुढे गेल्याचे सिद्ध झाले आहे. विमानाच्या मार्गाचा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, उड्डाण विश्लेषक अॅलेक्स माचेरास यांनी देखील ट्विटरवर या घटनेबाबत पोस्ट केली. याचबरोबर त्यांनी वैमानिकाच्या मनसिक ताणावरही बोट ठेवले. अशाच प्रकारची घटना मे महिन्यात घडली होती. न्यूयॉर्क ते रोम दरम्यानच्या फ्लाईटचे वैमानिक विमान 38 हजार फुटावरून जात असताना झोपी गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT