two tribal communities clashed 49 peple killed 200 injured Sunni-Shia clashes in Pakistan rak94 
ग्लोबल

Pakistan News : पाकिस्तानात रॉकेट, बॉम्ब घेऊन एकमेकांशी भिडल्या दोन दोन टोळ्या! ४९ जणांचा मृत्यू; काय आहे प्रकरण?

two tribal communities clashed In Pakistan : पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून भीषण दंगली सुरू आहेत. दोन समाज हे एका जमीनीच्या तुकड्यासाठी आपापसात भिडले आहेत.

रोहित कणसे

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून भीषण दंगली सुरू आहेत. येथील दोन समाज हे एका जमीनीच्या तुकड्यासाठी आपापसात भिडले असून पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सुरू असलेल्या या दंगलीत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पण नेमकं हा वाद काय आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

या दंगलीत या टोळ्यांकडून कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे, मोर्टार, रॉकेट आणि ऑटोमॅटीक गनही वापरल्या जात आहेत. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी जमिनीच्या वादावरून दोन जमातींमध्ये हिंसाचार सुरू झाला. पीवर, टांगी, बालिशखेल, खार कलाय, मकबल, कुंज अलीझई, पारा चमकनी आणि करमनसह अनेक भागात दंगल पसरली होती.

हिंसाचाराचे कारण काय?

पाकिस्तानात सुरू असलेल्या हिसांचारामागील कारण हे एक जमीनीचा तुकडा असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात देखील याच जमीनीवरून वाद झाला होता यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात दोन टोळ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. या हिंसाचारात ४९ लोक मारले गेले आहेत तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत.

अनेक वर्षांपासून सुरू आहे वाद

अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात या दोन टोळ्यांत संघर्ष सुरू आहे. या भागाला आदिवासी आणि धार्मिक गटांत हिंसाचाराचा इतिहास असून जातीय दंगलीबरोबरच दहशतवादी हल्ले देखील झाले आहेत. तालिबानने देखील या भागाला नेहमीच लक्ष्य केले आहे. चार दिवसांपूर्वी जमिनीवरून वादावरून दोन समुदायात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचाराचे लोण देशातील इतर भागांमध्ये देखील पसरले आहे.

हा वाद ३० एकर जमीनीसाठी सुरु असून गुलाब मिल्ली खेल आणि मिदगी कुल्ले या दोन टोळ्यांमध्ये सुरू आहे. गुलाब मिल्ली खेल यांचा संबंध शिया समुदायाशी असून मिदगी कुल्ले सुन्नींशी संबंधीत आहेत. या वादात अनेक वेळा सशस्त्र चकमकी देखील झाल्या आहेत. हे प्रकरण आणखी पेटले आहे.

सतत गोळीबार सुरू असल्याने सध्या या परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजार बंद करण्यात आले आहेत. तर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद आहे. परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस देखील तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT