UAE BAPS Hindu Mandir
UAE BAPS Hindu Mandir Esakal
ग्लोबल

UAE BAPS Hindu Mandir: मुस्लिम देशात जमले हिंदू भाविक, एका दिवसात ६५ हजार लोक पोहोचले अबुधाबीच्या BAPS मंदिरात

अंकिता खाणे (Ankita Khane)

अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे बांधलेले हे धार्मिक स्थळ BAPS हिंदू मंदिर रविवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. पहिल्याच दिवशी मंदिरात पोहोचणाऱ्या भाविकांच्या संख्येने ६० हजारांचा आकडा पार केल्याची आकडेवारी सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्येच या मंदिराचे उद्घाटन केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 40 हजारांहून अधिक भाविक सकाळी बस आणि कारमधून आले होते. तर सायंकाळी हा आकडा 25 हजारांवर पोहोचला. विशेष म्हणजे एवढी गर्दी असतानाही प्रत्येकजण कोणतीही धक्काबुक्की न करता दर्शनासाठी रांगेत थांबलेले दिसले.

साधू ब्रह्मबिहारीदास याबाबत बोलताना म्हणाले, 'आम्ही UAE च्या नेत्यांचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य आणि नवीन बस सेवेबद्दल त्यांचे आभारी आहोत. मी त्या भक्तांचेही आभार मानू इच्छितो जे दर्शनासाठी अतिशय शांततेत रांगेत उभे राहिले. हे मंदिर अध्यात्माचे, सद्भावनेचे प्रतीक म्हणून काम करेल जे सर्व लोकांना एकत्र आणेल.

अबू धाबीचे सुमंत राय म्हणतात, 'हजारो लोकांमध्ये इतकी अप्रतिम व्यवस्था मी कधीच पाहिली नाही. मला भिती वाटत होती की मला तासनतास वाट पहावी लागेल आणि शांततेने दर्शन घेता येणार नाही, परंतु आम्ही चांगले दर्शन घेतले आणि आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. BAPS स्वयंसेवक आणि मंदिराच्या कर्मचाऱ्यांचे आभार.

UAE मधील पहिले हिंदू मंदिर

2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 13.5 एकर जमीन दान केली होती. नंतर 2019 मध्ये, UAE सरकारने मंदिरासाठी आणखी 13.5 एकर जमीन दिली, ज्यामुळे मंदिरासाठी मिळालेली जमीन 27 एकर झाली. 2017 मध्ये पीएम मोदींनी मंदिराची पायाभरणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT