diane Abbott  
ग्लोबल

UK Elections: पहिल्या कृष्णवर्णीय महिला खासदाराच्या उमेदवारीवरून वाद; अखेर लेबर पार्टीने घेतलं नमतं

Diane Abbott can run in election:पक्षाने जुलै मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डायने एबॉट यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिक पुजारी

लंडन- ब्रिटनची पहिली कृष्णवर्षीय महिला खासदार डायने एबॉट यांच्या पुन्हा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना लेबर पार्टीकडून पुन्हा तिकीट दिलं जाणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, लेबर पार्टीच्या प्रमुख नेतृत्त्वाने यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षाने जुलै मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डायने एबॉट यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लेबर पार्टीचे नेता कीर स्टारमर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डायने एबॉट या १९८७ पासून लेबर पार्टीकडून खासदार आहेत. यूकेमध्ये ४ जुलै रोजी निवडणुका होतील अशी घोषणा पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली होती. डायने एबॉट या लेबर पार्टीच्या उमेदवार म्हणून लढण्यासाठी स्वतंत्र आहेत, अशी माहिती स्टारमर यांनी दिली.

गेल्या एका वर्षांपासून डायने एबॉट यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता होती. कारण गेल्या वर्षी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. ७० वर्षीय एबॉट यांनी म्हटलं होतं की,आयरिश आणि यहुदी लोकांना त्यांच्या संपूर्ण जिवनामध्ये कधीही वंशवादाचा सामना करावा लागला नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी माफी देखील मागितली होती.

मागील आठवड्यामध्ये एबॉट यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. एबॉट यांनी फेसबुकवर पोस्ट करुन मोठा दावा केला होता. पक्ष मला निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी देत नाहीये, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर एका कृष्णवर्णीय उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखलं जात आहे, असं म्हणत ऋषी सुनक यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

उत्तर पूर्व लंडन लोकसभा मतदारसंघातून एबॉट निवडणुकीला उभ्या राहतील का नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, माजी नेते जेरेमी कॉर्बिंन यांच्याशी जवळीक असलेल्या डाव्या विराचधारेच्या लोकांना स्टारमर पक्षातून काढत असल्याच्या चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT