Sex 
ग्लोबल

सेक्स करण्यापूर्वी पोलिसांना द्यावी लागणार माहिती; कोर्टाचा अजबगजब आदेश

वृत्तसंस्था

लंडन : खासगी जीवन कसे असावे, ही प्रत्येकाची चॉईस असते. पण युनायटेड किंग्डममधील एका प्रकरणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एका प्रकरणामध्ये कोर्टानेच आरोपीला अजबगजब अट घातली आहे. सेक्शुअल हॅरेसमेंटप्रकरणी आरोपी असलेल्या एका ब्रिटीश नागरिकाला महिलांपासून दूर ठेवण्यासाठी तेथील कोर्टाने विचित्र फंडा शोधला आहे. कोणत्याही महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्याआधी २४ तास त्यासंदर्भातील माहिती आरोपीने पोलिसांना द्यावी, असा आदेशच यॉर्कच्या दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचं वृत्त द गार्डियन या इंग्रजी वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

अशी अजबगजब अट घातलेल्या आरोपीचं नाव आहे डीन डेअर. ३९ वर्षांच्या डीनने सेक्स करताना महिलांवर हल्ले केले आहेत. डीनने १४ वर्षीय मुलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण कोर्टाला समजले. एवढेच नव्हे तर डीनने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीची छेड काढण्याचीदेखील धमकी दिली होती. 

डीन हा बांधकाम कर्मचारी असून तो पश्चिम लंडनमधील नॉटिंग हिल्स येथे वास्तव्यास आहे. त्याने आतापर्यंत अनेक महिलांची छेड काढण्याचे कारनामे केले आहेत. त्यामुळे बलात्काराचे अनेक आरोप असणाऱ्या डीनवर अशा प्रकारे आळा घालण्याचा प्रयत्न कोर्टाने केला आहे. इंटरनेट, कॉल आणि मेसेज पाठविण्यासाठी वापरत असलेल्या फोनबद्दल त्याला यॉर्कशायर पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे. तसेच दैनंदिन कामावेळी आवश्यक असल्यासच महिलांशी बोलण्याची सक्त ताकीद त्याला दिली आहे. 

डीनला सेक्स करण्याची इच्छा झाल्यास त्याने आपल्या महिला जोडीदाराबाबतची माहिती २४ तास अगोदर पोलिसांना द्यावी लागणार आहे आणि या नियमाचं उल्लंघन केल्यास त्याला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, असंही कोर्टानं जाहीर केलं आहे. 

दरम्यान, डीनविरोधात सात महिलांनी तक्रार दाखल केली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टात सुनावणीदरम्यान डीनचे वर्तनही चुकीचे होते. महिलांनी दिलेल्या तक्रारींमध्ये डीन दोषी आढळला पण कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. कोर्टाने डीनविरोधात सेक्शुअल रिस्क ऑर्डर लागू केले आहेत. एखाद्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसला तरी सेक्शुअल हॅरेसमेंट होण्याचा धोका असल्यास कोणत्याही व्यक्तीस हे आदेश लागू होतात. मागील वर्षी मार्चपासून इंग्लंड अॅण्ड वेल्समध्ये हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT