Russia ukraine Sakal
ग्लोबल

Ukraineचा ध्वज खेचला! युक्रेनी खासदाराने Russiaच्या प्रतिनिधीला भर सभेत केली मारहाण | Video Viral

रशिया आणि युक्रेनमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या रशिया आणि युक्रेनमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला असून रशियाचा एक प्रतिनीधी युक्रेनचा झेंडा खाली ओढताना दिसत आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनच्या एका खासदाराने त्याच्या चेहऱ्यावर बुक्की मारल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, हा व्हिडिओ तुर्की येथील अंकारा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. आयोजित केलेल्या परिषदेत युक्रेनचा ध्वज एका रशियन प्रतिनिधीने हिसकावून घेतला. त्यानंतर रागावलेले युक्रेनचे खासदार ओलेक्‍सँडर मारिकोव्स्की यांनी सदर व्यक्तीला पळत जाऊन चेहऱ्यावर बुक्की मारली. त्यानंतर काही व्यक्तींनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

दरम्यान, सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यामधील वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर युक्रेनशी कोणतीही वाटाघाटी करणार नसल्याचा निर्णय पुतीन यांनी घेतला आहे. त्यानंतर या व्हिडिओवरून आता हा वाद जास्त चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Shravan Month 2025 Fasting Benefits: श्रावणातील उपवासामुळे मिळते शरीराला नैसर्गिक डिटॉक्स, जाणून घ्या फायदे

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

SCROLL FOR NEXT