Ukraine - Russia crisis meeting Representative back to country Vladimir Putin Moscow
Ukraine - Russia crisis meeting Representative back to country Vladimir Putin Moscow sakal
ग्लोबल

चर्चा निष्फळ, टेन्शन वाढले; युक्रेन- रशियाचे प्रतिनिधी मायदेशी

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाची धार काही केल्या कमी होताना दिसत नाही. तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये उभय देशांत पार पडलेली चर्चाही निष्फळ झाल्याने जगाचे ‘टेन्शन’ पुन्हा वाढले आहे. दुसरीकडे मारिऊपोल जोवर शरणागती पत्करत नाही तोपर्यंत आमच्या तोफा शांत होणार नाहीत असा स्पष्ट इशाराच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. इस्तंबूलमधील चर्चेची फेरी पार पडल्यानंतर रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

उभय देशांमध्ये बुधवारी पुन्हा चर्चा होणे अपेक्षित होते पण त्यांनीच येथून काढता पाय घेतल्याचे तुर्कस्थानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केले. या चर्चेतून ठोस असे काहीही निष्पन्न झाले नसले तरीसुद्धा आम्ही आमचा प्रस्ताव पुतीन यांच्यासमोर मांडून त्यावरच ते रशियाची भूमिका स्पष्ट करतील असे रशियाचे संरक्षणमंत्री अलेक्झांडर फोमीन यांनी सांगितले.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, ‘‘ या सगळ्यातील सर्वांत सकारात्मक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे युक्रेनने लेखी प्रस्ताव दिला असून त्यावर आणखी बरेच काम करणे गरजेचे आहे.’’ युक्रेनने शांतता कराराच्या अनुषंगाने सविस्तर आराखडा सादर केला असून त्यामध्ये तटस्थ राहण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यासाठी अन्य त्रयस्थ देशांनी म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, तुर्कस्तान, चीन आणि पोलंड यांनी हमी घ्यावी असा त्यांचा आग्रह आहे.

दुसरीकडे रशियानेही युद्धाच्या आघाडीवर काहीशी नरमाईची भूमिका घेण्याची तयारी दर्शविली आहे. किव्ह आणि चर्निव्ह या दोन शहरांभोवतीचा विळखा सैल करण्याची तयारी रशियाकडून दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र युद्धभूमीवर याचे नेमके काय पडसाद उमटतात याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. दोनेतस्क प्रदेशातील जवळपास सगळ्या आघाड्यांवर रशियाकडून तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. रशियाच्या आक्रमणाचा सर्वांत मोठा फटका मारिऊपोलला बसला. युक्रेनच्या आपत्कालीन मदतीसाठीच्या संस्थेने मायकोलाइव्हवर रशियाने केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १४ वर गेल्याचा दावा केला आहे.

चर्चेवेळी न खाण्याच्या सूचना

इस्तंबूलमध्ये रशियासोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या युक्रेनी प्रतिनिधींना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या चर्चेदरम्यान काहीही खाऊ नका तसेच कोणत्याही पेयाचे प्राशनही करू नका असे त्यांना सांगण्यात आले होते. रशियन अब्जाधीश रोमन अॅंब्रामोव्हिक आणि अन्य दोन चर्चेत सहभागी झालेल्यांवरील कथित विषप्रयोगामुळे युक्रेनकडून ही काळजी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या चर्चेत रोमन अॅंब्रामोव्हिक देखील सहभागी झाले होते. येथील शोधपत्रकारांच्या एका गटाने त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

युक्रेनमधून ४० लाखांपेक्षाही अधिक लोकांचे पलायन

जिनिव्हा : रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्वासितांचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून आतापर्यंत चाळीस लाखांपेक्षाही अधिक लोकांना युक्रेनमधून पलायन करावे लागले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांशी संबंधित संस्थेने म्हटले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचा युरोपातील सर्वांत मोठा निर्वासितांचा संघर्ष आहे. युक्रेनमधून पलायन केलेल्यांपैकी २५ लाख लोक हे एकट्या पोलंडमध्ये आले असून अन्यजणांनी दुसऱ्या शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे. या युद्धामुळे ६५ लाखांपेक्षाही अधिक लोकांना देशांतर्गतच दुसऱ्या भागांमध्ये विस्थापित व्हावे लागले आहे, असेही ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. रुमानियामध्ये ६ लाख ८० हजार लोकांनी आश्रय घेतला असून मोल्दोवामध्ये ३ लाख ८७ हजार आणि हंगेरीमध्ये ३ लाख ६४ हजार लोकांना जावे लागले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर प्रथमच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास चाळीस लाखांपेक्षाही अधिक लोकांनी देश सोडल्याचे बोलले जाते. या निर्वासितांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानेच पुढाकार घेतला असून त्यांना संरक्षण देण्याबरोबरच आपत्कालीन आर्थिक मदतही केली जात आहे.

रशियावर विश्वास ठेवता येत नाही : झेलेन्स्की

युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी उभय देशांमध्ये पार पडलेल्या चर्चेतून काही सकारात्मक निष्कर्ष हाती आले असले तरीसुद्धा रशियावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही असे म्हटले आहे. दोन्ही देशांतील या चर्चेबाबत तुर्कस्तानची भूमिका सकारात्मक होती पण अमेरिकेने मात्र त्याबाबत आधीच साशंकता व्यक्त केली होती. झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ संदेश मंगळवारी रात्री व्हायरल झाला असून त्यात त्यांनी युक्रेनच्या लष्कराने सडेतोड उत्तर दिल्यानेच रशियाला किव्ह आणि चर्निव्ह भोवतीचा विळखा सैल करावा लागला असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT