America on Ukraine Russia War e sakal
ग्लोबल

भारत स्वतःचे निर्णय घेईल, मोदी-बायडन यांच्या चर्चेनंतर अमेरिकेचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (US President Biden) यांनी सोमवारी शिखर परिषदेत युक्रेन युद्धावर चर्चा केली. त्यानंतर व्हाईट हाऊसकडून याबाबत माहिती देण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष बायडन युक्रेन-रशिया युद्धात (Ukraine Russia War) भूमिका घेण्यासाठी भारतावर दबाव टाकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता अमेरिकेने त्याला उत्तर दिले. भारत स्वतःचे निर्णय घेईल, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं.

युक्रेन-रशिया युद्धामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात का? असा प्रश्न व्हाईट हाऊसमध्ये विचारण्यात आला, यावेळी भारत स्वतःचा निर्णय घेईल. पण, त्यांच्यासोबत चर्चा सुरूच राहील. नागरिकांच्या हत्येचा निषेध आणि स्वतंत्र तपासासाठी समर्थन देण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. बुचा येथील नागरिकांच्या हत्येबाबत भारतानं मोठी भूमिका घेतली आहे, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. न्यूयॉर्कमधील नागरिकांच्या हत्येचा निषेध करत स्वतंत्र तपासाच्या समर्थनार्थ भारताने काही जोरदार विधाने केली आहेत. भारत युक्रेनला मानवतावादी मदत सामग्री देखील पुरवत आहे. त्यामुळे आम्ही भारतासोबत या चर्चा सुरू ठेवणार आहोत. मला वाटते की भारत स्वतःचे निर्णय घेईल, परंतु आम्ही चर्चा सुरू ठेवू, असं व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

भारताला रशिया आणि चीनमधील संबंधांबाबत चिंता आहे. भारत नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करत आहे. जेव्हा रशिया आणि चीनचे संबंध अधिक चांगले होतील त्याचा परिणाम भारतावर होणार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी शिखर परिषदेनंतर पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी चर्चेमध्ये युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, बुचा शहरात निष्पाप नागरिकांच्या हत्येची बातमी अतिशय चिंताजनक आहे. आम्ही ताबडतोब याचा निषेध केला आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आम्ही युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणावर आणि त्यांना मानवतावादी मदतीचा अखंड पुरवठा करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा मी वॉशिंग्टनला आलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की भारत-अमेरिका भागीदारी अनेक जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी हातभार लावू शकते. मी तुमच्यासोबत पूर्णपणे सहमत आहे. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून आम्ही भागीदार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT