Former soldier Ola Tverdokhlib Former soldier Ola Tverdokhlib
ग्लोबल

९८ वर्षीय वृद्धेला दुसऱ्यांदा लढायचं युद्ध; परंतु...

सकाळ डिजिटल टीम

रशियाने ( russia) युक्रेवर हल्ला केलेल्याला आता अनेक दिवस झाले आहे. मात्र, अद्याप युद्ध काही थांबलेले नाही. रशियाने युक्रेवर चांगलाच ताबा मिळवलेला आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसानही झाले आहे. अशात युक्रेनने देशातील नागरिकांना सैन्यात येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ९८ वर्षीय महिलेने तयारी दर्शवली होती. मात्र, तिला नकार देण्यात आला. ओल्हा ट्वेर्डोखलिबोवा असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

रशियाने युक्रेवर (ukraine) आक्रमण करून प्रमुख शहरे उद्ध्वस्त केली आहेत. मात्र, या भीषण परिस्थितीमध्ये युक्रेनच्या सैनिकांचे धाडस जगभर चर्चेचा विषय झाला आहे. सामान्य नागरिकही सैन्यात भरती होऊन देशासाठी हौतात्म्य द्यायला तयार आहे. दरम्यान, एका ९८ वर्षीय युक्रेनियन महिलेने रशियन (russia) सैनिकांविरुद्ध युद्धात भाग घेण्याची तयारी दर्शवली होती. या महिलेने दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला होता.

युक्रेनच्या गृहमंत्रालयाने मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ओल्हा ट्वेर्डोखलिबोवा नावाच्या ९८ वर्षीय महिलेचा उल्लेख केला आहे. ओल्हा या योद्धा आहे. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यानंतर ओल्हाने मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होण्याची तयार दर्शवली होती. परंतु, वयामुळे त्यांना नकार देण्यात आला.

पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओला ट्वेर्डोखलिबोवा या ९८ वर्षीय महिलेने तिच्या आयुष्यात दुसऱ्यांदा युद्धाचा सामना केला आहे. त्यांनी पुन्हा आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास तयार दर्शवली होती. परंतु, सर्व गुण आणि अनुभव असूनही वयामुळे त्यांना नकार देण्यात आला. आम्हाला खात्री आहे की ती लवकरच किव्हमध्ये आणखी एक विजय साजरा करू, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली माहिती

रशिया (russia) आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. दोन्ही देशादरम्यान शांतता चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी रशियन फौजांकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरावर हल्ला केला जात आहे. या युद्धात दोन्ही देशांना जीवितहानीला तोंड द्यावे लागत आहे. अशात दुसऱ्या महायुद्धात उत्तुंग कामगिरी केलेल्या युक्रेनच्या (ukraine) ९८ वर्षीय माजी महिला लष्करी अधिकारी ओल्हा ट्वेर्डोखलिबोवा यांनी युद्धात उतरण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 LIVE Update : पुण्यातील प्रभाग 24 मध्ये मशीन बंद पडल्याने मतदार संतापले

माणुसकीला सलाम! कृष्‍णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना..

Municipa Election Voting Maharashtra : कोल्हापूर, इचलकरंजीत रात्रीस खेळ चाले कार्यक्रमानंतर मतदानास सुरूवात, टोकाच्या ईर्षेमुळे जिल्ह्यात हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra Municipal Election Voting Live : राज्यात २९ महापालिकेसाठी आज मतदान, मुंबई, नाशिक, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, शहराच्या कारभाऱ्यांचा होणार फैसला

Satara politics: साताऱ्यात भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र?; शिवसेना अन् दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून गतिमान हालचाली!

SCROLL FOR NEXT