ग्लोबल

युक्रेन-रशिया वादावर काँग्रेस म्हणतं; 'चीन भारतावर चालून आला तर...'

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine Conflict) आज हल्ला केला आहे. त्यानंतर आता युक्रेनमधील परिस्थिती चिघळली असून युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी भारताकडे मध्यस्थीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी भारत सरकारकडे रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्याविषयीची भूमिका घेण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी आणि त्यांना हे युद्ध थांबवण्यास सांगाव, असं कळकळीचं आवाहन या युक्रेनच्या राजदुतांनी केलं आहे. (Russian President Vladimir Putin) यावर आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी म्हटलंय की, युक्रेनने भारताला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची केलेली विनंती पूर्णपणे समजण्यासारखी आहे. आमची भूमिका अशी आहे की, आम्ही इतर देशांवर आक्रमण करण्याचा, हिंसाचाराचा आणि युद्धाद्वारे शासन बदलण्याचं समर्थन करत नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जागेसाठी महत्वाकांक्षा बाळगणारा भारतासारखा देश आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तत्त्वांवर पूर्णपणे मौन बाळगतो तेव्हा त्याचं चांगलं प्रतिबिंब निश्चितच पडत नाही

पुढे ते म्हणाले की, रशिया हा मित्र आहे आणि काही कायदेशीर सुरक्षेचे मुद्दे असू शकतात परंतु भारताने यावर अचानक पूर्णपणे मौन पाळणं हे युक्रेन आणि त्याच्या मित्रांसाठी निराशाजनक ठरेल. या प्रकरणी भारत पूर्णपणे शांत आहे ही खेदाची गोष्ट आहे. त्याठिकाणी भारतातील 24,000 विद्यार्थी आहेत तर 2,300 केरळचे आहेत जे युक्रेनमध्ये अडकले आहेत. आणि याप्रकरणी हस्तक्षेपासाठी मलाही मेसेजेस आले आहेत. हवाई-क्षेत्र बंद असल्याने त्यांना देशात परत आणण्याचा कोणताही व्यावहारिक मार्ग सध्या नाहीये, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, जर चीन आपल्या देशावर चालून आला तर इतर देशांनी आपल्या बाजूने उभे राहावे अशी आपलीही इच्छा असेल. जर युक्रेनची अपेक्षा असेल की आम्ही रशियनांशी बोलणे आवश्यक आहे, तर किमान आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि या समस्येच्या योग्य बाजूने उभं रहावं.

युक्रेनच्या राजदुतांनी काय म्हटलंय?

त्यांनी म्हटलंय की, या प्रकरणामध्ये तुमचे पंतप्रधान पुतीन यांच्यासोबत बोलू शकतात. ते आमच्या राष्ट्राध्यक्षांशीही बोलू शकतात. इतिसाहात देखील, भारताने नेहमीच शांतता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी एक मजबूत आवाज म्हणून आम्ही भारताकडे अपक्षेने पाहत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. (Narendra Modi) सध्याच्या या परिस्थितीमध्ये, आम्ही भारताकडे पाठिंब्यासाठीची याचना करत आहोत. पंतप्रधान मोदी हे जगातील एक अत्यंत ताकदवान आणि आदरणीय नेतृत्व आहे.

पळापळ, घबराट आणि लुटालूट

रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये सगळीकडे घबराट पसरली. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू झाली. लोकांनी मोठा प्रमाणावर अन्नधान्याचा साठा करण्यास सुरुवात झाल्याने बहुतेक सर्व किराणा दुकानांतील सामान काही तासांत संपले. ज्या दुकानांत सामान आहे तेथे मोठ-मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. काही ठिकाणी लुटालूट झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

युक्रेनची जगाला मदतीसाठी हाक

संयुक्त राष्ट्रांतील युक्रेनचे राजदूत सर्जी किस्लित्सिया यांनी या संकटातून वाचविण्यासाठी संपूर्ण जगाला मदतीसाठी साद घातली. ``आम्हाला वाचवा! रशिया आम्हाला उद्ध्वस्त करत आहे. संयुक्त राष्ट्रांत बसून आपण शांततेबाबत चर्चा करत आहोत, तिकडे रशिया आमच्या देशात सैन्य पाठवत आहे,`` असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT