Ukraine Russia War Google
ग्लोबल

शस्त्र वापरता येणाऱ्याने लष्करात यावं; युक्रेनचं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

आज रशियाने युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला आहे. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनमधून विदारक दृश्य समोर आले आहेत. युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला असून आता युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी शस्त्र वापरता येणाऱ्यांना लष्करामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केला आहे.

युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले आहे. पण, रशियाच्या तुलनेत युक्रेनकडे सैन्य तोकडं आहे. त्यामुळे आता रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना जनतेला आवाहन केलं आहे. ज्यांना शस्त्र वापरता येतात किंवा ज्यांची तयारी आहे त्यांनी प्रादेशिक संरक्षण दलामध्ये सहभागी व्हावे आणि राष्ट्राला मदत करावी, असं आवाहन युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह म्हणाले. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती चिघळली आहे. रशियाकडून सातत्यानं बॉम्ब हल्ले करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचं युक्रेन पोलिसांनी म्हटलं. पोदिल्स्कमधल्या एका लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 6 जण मारले गेले असून 7 जण जखमी असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच १९ जण अद्यापही बेपत्ता आहेत. तसेच रशियाने युक्रेनच्या लष्करी तळावर देखील हल्ला केला. रशियानं राजधानी कीव्हच्या जवळ असलेल्या बोरिसपिल विमानतळ आणि इतर विमानतळांवर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आहे.

पुतिन यांनी आज युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनच्या लष्करी तळांवर जोरदार बॉम्बहल्ले करण्यात आले. पण, रशियानं युक्रेनमधल्या शहरांवर हल्ला करत असल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. रशिया युक्रेनमधील लष्कराच्या पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण आणि हवाई दलाला लक्ष्य करत असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT