बेकरीबाहेर केक घेऊन पैसे दान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.  
ग्लोबल

युक्रेनसाठी कायपण! तरुणीने केक विकून सैन्याला केली लाख मोलाची मदत

ही तरूणी सध्या टेक्सासमध्ये राहत असून तिथे बेकरी चालवते

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून रशिया- युक्रेनचे युद्ध सुरू आहे. अनेक लोकं रशियाविरोधात भूमिका घेत आहेत. तसेच युक्रेनला पुन्हा सावरण्यासाठी काय करावं लागेल याचाही विचार करत आहेत. यात युक्रेनमध्ये लहानाचे मोठे झालेले पण, सध्या स्थानिक नसलेले लोकं आघाडीवर आहेत. यातलाच एक भाग म्हणून टेक्सासमधल्या युक्रेनियन मालकीच्या बेकरीने युद्धाविरोधी भूमिका घेत आठवड्याच्या शेवटी त्यांच्या विक्रीतील रक्कम देणगी स्वरूपात युक्रेनला दिली आहे. आठवड्याच्या शेवटी टेक्सासमधल्या सॅन अँटोनियो मधील हजारो लोक एका रांगेत उभे होते. त्या प्रत्येकाने बेकरीच्या बाहेर ठेवलेल्या बॉक्समधून चीजकेक, एक्सप्रेसो कॉफी घेऊन झालेल्या बिलाचे डॉलर रशियामुळे बळी गेलेल्या युक्रेनवासीयांसाठी दान केले. २५ ते २७ फेब्रुवारी अशा अवघ्या तीन दिवसात बेकींग कंपनीची युक्रेनियन मालकीण अॅना अफानासिएवाने स्लोव्हाकियन भागीदार व्हिक्टर क्रिझ्माच्या मदतीने युक्रेनसाठी $72,400 पेक्षा जास्त पैसे जमा केले.

अशी केली मदत

याविषयी अॅना अफानासिएवाने सीएनएनला सांगितले की, देशाला मदत करण्याची कल्पना आम्हाला सहज सुचली. आम्ही काय करू शकतो हा विचार करताना अनेक प्रश्न मनात येत गेले. त्यातूनच जे आपल्याकडे आहे तेच विकून देशाला थोडी तरी आर्थिक मदत करायची अशी कल्पना सूचली. त्यामुळे चीजकेक विकून आम्ही पैसे ऊभे करण्याचा निर्णय घेतला. देशात युद्ध सुरू असल्याची बातमी मला आईने फोनवरून दिली, असं अॅना सांगते. आधी मला विश्वासच बसला नाही. युक्रेनियन सैन्याचे प्रात्यक्षिक सुरू असेल असे मला आधी वाटले. पण सोशल मीडियावर पाहिल्यावर हे युद्ध असल्याची खात्री पटली. त्यानंतर देशासाठी काहीतरी करावे वाटले.

दोघींनी तयार केलेले चीजकेक हातोहात खपले.

अशी केली तयारी

24 फेब्रुवारी रोजी, अफानासिएवाने Laika Cheesecakes च्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट करून रक्कम दान करण्याविषयी माहिती दिली. आधी तिला इतकी मदत मिळेल याची कल्पनाच नव्हती. पण फक्त चार तासातच तिच्याकडे झालेल्या गर्दीमुळे चीजकेक, कॉफीसह सर्व पदार्थ संपले. त्यानंतरही लोकांची एक रांग होती जे चार तास वाट पाहत होते. विकेंडच्या शेवटी $25,000 जमा झाले होते. हा सर्व निधी ती युक्रेनच्या नॅशनल बँकेच्या विशेष खात्यात दान करणार असून तो जो युक्रेनच्या सशस्त्र दलांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

SCROLL FOR NEXT