Ukraine Russia War Live ANI
ग्लोबल

Ukraine Russia War : रशियाकडून ‘व्हॅक्युम बाँब’चा वापर

युक्रेनचा आरोप; क्लस्टर बाँबच्याही वापराची शंका

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन: युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाकडून व्हॅक्युम बाँब आणि क्लस्टर बाँबचा वापर होत असल्याचा आरोप युक्रेन सरकार आणि मानवाधिकार संघटनांनी केला आहे. विनाशकारी असलेल्या या दोन्ही प्रकारच्या बाँबच्या वापरावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली आहे.

रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी क्लस्टर बाँबचा वापर केला असल्याचा आरोप ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्‌स वॉच या संघटनांनी केला आहे. शाळा, निवासी भागांवरही रशियाचे हल्ले होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कारोव्हा यांनीही अमेरिकेतील खासदारांची आज भेट घेतली आणि रशियाकडून व्हॅक्युम बाँबचा वापर होत असल्याचा आरोप केला. ‘रशियाने आज युक्रेनमध्ये व्हॅक्युम बाँबचा वापर केला. युक्रेनमध्ये मोठा विनाश घडवून आणण्याचा रशियाचा इरादा असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यांना रोखण्यासाठी आमची अमेरिकेबरोबर चर्चा सुरु असून आम्हाला आणखी शस्त्रांची आवश्‍यकता आहे,’ असे मार्कारोव्हा यांनी पत्रकारांना सांगितले.

रशियाकडून नकार

मॉस्को : क्लस्टर बाँब किंवा व्हॅक्युम बाँबचा वापर केल्याचा युक्रेनचा आरोप रशियाने फेटाळून लावला आहे. रशियाने अशा प्रकारच्या एकाही बाँबचा वापर केलेला नाही, तसेच आम्ही केवळ लष्करी तळांवरच हल्ले करत आहोत, असा दावा रशिया सरकारचे प्रवक्ते दीमित्री पेस्कोव्ह यांनी केला आहे. रशियावर दबाव आणण्यासाठी या अफवा पसरविल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

‘व्हॅक्युम बाँब’ म्हणजे काय?

थर्मोबॅरिक अस्त्र, म्हणजेच व्हॅक्युम बाँब हा उच्च तापमान निर्माण करणारा स्फोट घडवून आणण्यासाठी सभोवतालच्या हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो. यामुळे स्फोटाची एक अधिक काळ टिकणारी अत्यंत उष्ण लाट तयार होते. मानवी देहाचीही वाफ करण्याची या लाटेत क्षमता असते. या बाँबच्या वापरावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. रशियाने या बाँबचा वापर केल्याची अद्याप अधिकृत माहिती नाही. अमेरिकेनेही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ‘रशियाने अशा बाँबचा वापर केला असेल, तर तो मोठा युद्धगुन्हा ठरेल,’ असे ‘व्हाइट हाऊस’ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT