ग्लोबल

संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) हिंदी भाषेच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. याशिवाय बंगाली आणि उर्दू भाषांचाही समावेश करण्यात आला आहे. आता यूएनचे सर्व काम आणि महत्त्वाचे संदेश या भाषांमध्येही सादर केले जाणार आहे. दरम्यान, भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषा आहेत, ज्यामध्ये इंग्रजी आणि फ्रेंच मुख्य आहेत. त्यानंतर आता हिंदी, बंगाली आणि उर्दू भाषांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. (UNGA Adopts Resolution Of Hindi Language )

यावर्षी पहिल्यांदाच हिंदी भाषेचाही या ठरावात समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये बांगली आणि उर्दूचाही उल्लेख आहे. या बदलांचे आम्ही स्वागत करतो असे UNGA चे भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले. हिंदीच्या प्रचारासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले असून, यासाठी 2018 मध्ये 'Hindi@UN' ही मोहिम सुरू करण्यात आली.

तिरुमूर्ती यांनी 1 फेब्रुवारी 1946 रोजी पहिल्या सत्रात स्वीकारलेल्या UNSC च्या ठराव 13 (1) चाही संदर्भ दिला. त्यात म्हटले आहे की, जोपर्यंत जगातील लोकांना त्यांच्या उद्दिष्टांची पूर्ण जाणीव होत नाही तोपर्यंत संयुक्त राष्ट्र आपली उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये बहुभाषिकतेचा खर्‍या अर्थाने स्वीकार करणे अत्यावश्यक आहे आणि ते साध्य करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रांना पाठिंबा देईल.

UN चा बहुभाषिक प्रस्ताव काय आहे

UNSC ने 1 फेब्रुवारी 1946 रोजी आपल्या पहिल्या अधिवेशनात एक ठराव पारित केला होता. ठराव 13(1) अन्वये, UN ने म्हटले आहे की, जोपर्यंत जगातील लोकांना UN ची उद्दिष्टे आणि कामांची पूर्ण जाणीव होत नाही तोपर्यंत संयुक्त राष्ट्र आपली उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. बहुभाषिकतेवर भारत अनेक वर्षांपासून यूएनमध्ये हिंदीला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. याच क्रमाने भारताच्या बाजूने प्रस्ताव मांडण्यात आला.

26 कोटींहून अधिक लोक हिंदी बोलतात

हिंदी ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. जगभरात 26 कोटींहून अधिक लोक हिंदी बोलतात. भारताव्यतिरिक्त नेपाळ, मॉरिशस, फिजी, गयाना, सुरीनाम येथेही हिंदी बोलली जाते. याशिवाय अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, न्यूझीलंड येथेही हिंदी भाषिक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT