America Tornadoes esakal
ग्लोबल

America Tornado : अमेरिकेत भीषण चक्रीवादळाचा कहर; 21 जणांचा मृत्यू, डझनभर लोक जखमी

विनाशकारी वादळानं अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात (America Tornado) पुन्हा कहर केलाय.

Balkrishna Madhale

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात विनाशकारी चक्रीवादळ आणि जोरदार वादळानं कहर केला होता, त्यामुळं अनेक घरांची पडझड झाली होती.

या विनाशकारी वादळानं अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात (America Tornado) पुन्हा कहर केलाय. देशातील विविध भागात भीषण वादळ आणि चक्रीवादळामुळं 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच, पीडितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

CNN च्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे युनायटेड स्टेट्सच्या (United States) दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागांमध्ये विनाशकारी वादळानं कहर केला. इलिनॉयमध्ये या उद्रेकात आणखी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वादळातील मृतांची संख्या 21 झाली आहे. अहवालानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी 60 हून अधिक चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी आर्कान्सामधील लिटल रॉक आणि इतर ठिकाणी विनाशकारी चक्रीवादळ धडकलं. यामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळं अनेकांचा मृत्यू झाला, तसंच अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आर्कान्सा विभागाच्या प्रवक्त्या लट्रेशा वुड्रफ यांनी सांगितलं की, 'क्रॉस काउंटीमधील लिटल रॉकच्या ईशान्येला चार लोक ठार झाले आहेत. विएनमध्ये अनेक इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय'. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात विनाशकारी चक्रीवादळ आणि जोरदार वादळानं कहर केला होता, त्यामुळं अनेक घरांची पडझड झाली होती. यात 23 जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT