ग्लोबल

अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी;अमेरिकेतील संशोधकांकडून अल्ट्रासेन्सिटिव्ह किट विकसित

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - जगभरात कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आरटीपीसीआर चाचणीपेक्षा एखाद्या तासात निकाल सांगणारी ॲंटीजेन चाचणीही विकसित करण्यात आली. आता, अमेरिकेतील इलिनॉईस विदयापीठातील संशोधकांनी अवघ्या पाच मिनिटांत कोरोनाचे निदान करणारी चाचणी विकसित केली आहे. पेपरवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर वापरून या अल्ट्रासेन्सिटिव्ह चाचणीतून कोरोनाचे निदान केले जाते. भारतीय वंशाचे प्रा.दिपांजन पान यांच्या नेतृत्वाखालील गटाने हे संशोधन केले. ‘एसीएस नॅनो’ या नियतकालिकात ते प्रकाशित झाले आहे.

संशोधकांनी ग्रॅफेनवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर तयार केला. त्यात कोरोना विषाणू ओळखण्यासाठी इलेक्ट्रिकल रचनाही तयार केली. संशोधकांनी प्रवाही पट्टी बनविण्यासाठी प्रथम ग्रॅफेन नॅनोप्लेटलेट्‌सच्या थराच्या मदतीने लेपन केलेला फिल्टर पेपर तयार केला. त्यानंतर, त्यांनी त्यात सोन्याचे इलेक्ट्रोड्‌स तसेच विदुयतीय मापनासाठी ग्रॅफेनच्यावर एक पॅड बसविले.  सोने व ग्रॅफेन अतिशय संवेदनशील असतात. त्याचप्रमाणे, त्यांची वाहकताही चांगली असते. त्यामुळे, या अल्ट्रासेन्सिटिव्ह चाचणीतून विद्युत संकेतातील बदल ओळखता येतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सेन्सर स्मार्टफोनलाही जोडता येतो
संशोधकांनी कोरोनाच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह नमुन्यांवर या चाचणीची कार्यक्षमता तपासली. त्यावेळी, निगेटिव्ह नमुन्यांच्या तुलनेत  पॉझिटिव्ह नमुन्यांमधील व्होल्टेजमध्ये वाढ झाली. त्यातून पाच मिनिटांत विषाणुच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यात आली. बायोसेन्सर या नमुन्यांतील विषाणुजन्य आरएनएच्या दाबामधील फरक ओळखण्यास सक्षम असल्याचे आढळले. संसर्गाची प्रगती ओळखण्यासाठी आरएनएचा हा दाब महत्वाचा ठरतो. कोठेही सहज नेता येण्यासारखा हा स्वस्त न्सर एलईडी स्क्रीन किंवा स्मार्टफोनलाही ब्लूटुथच्या माध्यमातून जोडता येतो. तो घरातही वापरता येतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चाचणींतील फरक
सध्याच्या आरएनएवर आधारित कोरोना चाचण्यांतून कोरोना विषाणुवरील एन जनुकाचे अस्तित्व नोंदवले जाते. मात्र, संशोधकांनी एन जनुकाच्या दोन भागांना लक्ष्य करण्यासाठी एएसओ प्रोब हे उपकरण तयार केले. त्यामुळे, चाचणीतून एन जनुकाच्या दोन भागांचे निरीक्षण केले जाणार असल्याने ही चाचणी अधिक विश्वासार्ह असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT