China-and-America 
ग्लोबल

अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला कोरोनाव्हायरसच्या साथीवरून केले लक्ष्य

पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरसच्या साथीवरून अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले आहे. या विषाणूच्या प्रसाराबाबतच्या माहितीत चीनने पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी करण्याचे आवाहन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाला शुक्रवारी (ता. १८) केले. तसेच या घातक विषाणूच्या उगमाबद्दलच्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तपासात चीन अडथळे आणत न असल्याचा आरोपही केला आहे.

कोरोनाच्या संसर्गाबाबत समजल्याच्या एक वर्षानंतर आता त्यांच्या नागरिकांना कथित लस देऊन सर्व जगाला पुन्हा एकदा संकटात लोटत असल्याचा आरोपही अमेरिकेने चीनवर केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व जगात अमेरिकेत कोरोनाचा प्रसार जास्त आहे. १७ लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्या आणि तीन लाखांपेक्षा जास्त मृत्यू येथे झाले आहेत. अमेरिकेचे गृहमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक होऊन एक वर्ष होत आले तरी जग अद्याप सावरले नसताना चीनमधील कम्युनिस्ट पक्ष या विषाणूबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवीत आहे. या साथीच्या उगमाची माहिती घेण्याच्या ‘डब्ल्यूएचओ’च्या कामात खोडा घालत आहे. कोरोनावरील चीनमधील कथित लसीच्या सुरक्षेबद्दल व परिणामाच्या माहितीचा अभाव असताना व वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्षात पारदर्शीपणा व विश्‍वासार्हता नसताना लसीकरण सुरू करून चीन त्यांच्या नागरिकांनाच नाही तर संपूर्ण जगाला संकटात ढकलत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ज्याच्या संसर्गाने जगातील लाखो नागरिकांचे जीव घेतले व लाखोजणांची रोजीरोटी नष्ट केली त्या विनाशकारी साथीचा प्रसार आणि कोरोना विषाणूच्या उगमाची खरी माहिती जाहीर करण्याची मागणी जगातील देशांनी चीनकडे करावी, असे आवाहन पॉम्पिओ यांनी केले. चीनच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार भविष्यात चीनमधून नव्या जागतिक साथीचा उगम होणार आहे.

चीनने दिली शिक्षा
कोरोनाची साथ हा अपघात नाही, असा पुनरुच्चार करीत या विघातक विषाणूबद्दल प्रसाराविषयी जगाला सावध करणाऱ्या चीनी शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि पत्रकारांना चीनने शिक्षा दिली, असा आरोप पॉम्पिओ यांनी केला. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT