Talibal Spokeperson 
ग्लोबल

Prophet Remark: आता तालिबाननं भारताला धर्मांधतेवरुन झाडलं लेक्चर!

या प्रकरणावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ माजला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीवरील वाद अद्याप शमण्याचं नाव घेत नाहीए. आखाती देशांनी यावरुन भारतावर आगपाखड केल्यानंतर आता स्वतः धर्मांधतेत माखलेल्या तालिबान प्रणित अफगाणिस्ताननं भारताला धर्मांधतेवरुन सुनावण्याचा प्रयत्न केला. (uproar over Prophet remark spreads many countries Taliban lectures India on fanatics)

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद्दीननं म्हटलं की, भारतील सत्ताधारी पक्षाकडून इस्लामच्या प्रेषितांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा इस्लामिक इमिरिट्स ऑफ अफगाणिस्तान तीव्र निषेध करतो. आम्ही भारत सरकारकडे आग्रह करतो की, त्यांनी इस्लामचा अपमान करणाऱ्या आणि मुस्लिमांच्या भावना भडकावणाऱ्या अशा धर्मांधांना रोखावं.

आत्तापर्यंत १४ इस्लामिक देशांनी याप्रकरणावरुन नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बहारिन, मालदिव्ज, लिबिया आणि इंडोनेशिया या देशांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर टीकाटिपण्णी होऊ लागल्यानं प्रेषित पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्माला भाजपनं भाजपतून निलंबित केलं असून त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द केलं आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारे वादग्रस्त विधान करणाऱ्या दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनाही निलंबित केलं आहे. तसेच भाजप सर्व धर्मांच्या प्रमुख व्यक्तींचा आदर करते असं स्पष्टीकरणही भाजपच्यावतीनं अधिकृत निवेदनाद्वारे दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT