US Astrology Influencer Esakal
ग्लोबल

US Astrology Influencer: पतीला भोसकलं, अन् चालत्या कारमधून लहान मुलांना दिलं फेकून.. ग्रहणाच्या भीतीने अमेरिकन इन्फ्लुएन्सरचं कृत्य

US Astrology Influencer: एका महिला ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपल्या पती व मुलांना संपवलं. युनायटेड स्टेट्समधील ज्योतिषशास्त्राच्या प्रभावखाली असलेल्या एका महिलेने सूर्यग्रहणाच्या दिवशी तिच्या जोडीदाराची हत्या केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

US Astrology Influencer: एका महिला ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपल्या पती व मुलांना संपवलं. युनायटेड स्टेट्समधील ज्योतिषशास्त्राच्या प्रभावखाली असलेल्या एका महिलेने सूर्यग्रहणाच्या दिवशी तिच्या जोडीदाराची हत्या केली. त्याचबरोबर तिच्या दोन मुलांना चालत्या कारमधून फेकून दिलं. बुधवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण होतं, त्यामुळे चिंतेत असलेल्या या महिलेने आधी दोन खून करून मग आत्महत्या केली.

अमेरिकेत ही घटना घडली असून डॅनियल जॉन्सन असं महिलेचं नाव आहे. डॅनियल जॉन्सन हिची 'अयोका' नावाची स्वतःची वेबसाईट चालवते. ती या नावाने देखील ओळखली जात होती.

डॅनियल सूर्यग्रहणाबाबत संशोधन करत होती, या सूर्यग्रहणामध्ये तिला भीती वाटू लागली. भीतीने तिने पायलट असलेल्या २९ वर्षीय पतीवर चाकूने वार केले, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या एका नऊ वर्षांच्या आणि दुसऱ्या आठ महिन्यांच्या मुलांना घेऊन कारने निघाली. यावेळी धावत्या कारमधून तिने आपल्या मुलांना बाहेर फेकलं. यामध्ये आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर मोठा मुलगा जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर कार झाडाला धडकली. यामध्ये तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कार झाडावर आदळल्याची माहिती मिळाली. तपासासाठी पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना महिलेच्या पतीचा जेलेन ॲलन चॅनीचा मृतदेह आढळला.

महिलेच्या मनावर सूर्यग्रहणाचे मोठ्या प्रमाणावर परिणाम झाले होते, तिचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वेबसाइटवर व सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे.

तिने 4 एप्रिल रोजी तिच्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहले होते की, "स्वतःचे रक्षण करा आणि तुमचे हृदय जपा. जग खूप झपाट्याने बदलत आहे आणि अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कोणाची बाजू घ्यायची असेल तर घ्या, आता तुमच्या आयुष्यात गोष्टी योग्य करण्याची वेळ आली आहे."

दरम्यान सुर्य आणि चंद्र ग्रहणांचा संबध भविष्यवाणीशी जोडले जातात. पण, याबाबत तज्ज्ञ सांगतात की, वास्तविक रित्या याचा कोणताही संबध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT