us county texas power drinking water crisis 
ग्लोबल

अमेरिकेत टेक्सास शहरात पाणी संकट; पिण्याच्या पाण्यासाठी लागल्या रांगा

सकाळ डिजिटल टीम

टेक्सास (अमेरिका) : चार दिवस लाईट नाही. तेथेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. लाईट नसल्यानं थंडीत कुडकुडण्याची वेळ आलीय. खायला अन्न नाही आणि सरकार हतबल. ही परिस्थिती एखाद्या अफ्रिकेतल्या किंवा आशियातल्या देशाची नाही. तर जगाची महासत्ता म्हणून घेणाऱ्या अमेरिकेतली ही परिस्थिती आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य असलेल्या टेक्सासमध्ये लाईट, पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. गेल्या चार दिवसांपासून टेक्सासमधील नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय घडले?
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात हिमवादळासारखी परिस्थिती आहे. प्रचंड बर्फवृष्टीमुळं चार दिवसांपूर्वी विजेच्या तारा तुटल्या आहेत. परिणामी विजेचं संकट मोठ्या प्रमाणावर आलं आहे. बर्फवृष्टी आणि वीज नाही. यामुळं नागरिकांचे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. टेक्सास राज्यातील 254 विभागांपैकी 160 विभागांमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवलं आहे.  वीज नसल्याने त्याचा परिणाम इतर सुविधांवर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडीत झाल्यामुळं पाण्यासाठी नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. बर्फवृष्टी आणि वीज नसल्यामुळं पाण्यावर प्रक्रिया करणारे प्लँट बंद पडले आहेत. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे.

टेक्सास शहर ठप्प
प्रचंड प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळं टेक्सास शहर ठप्प झालंय. शहरावर बर्फाची चादर असून, व्यवहार ठप्प झाले आहेत. शहराच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. गेल्या 24 तासांत काही ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी, शहराचा बहुतांश भाग अजूनही अंधारात असल्याची माहिती आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी सूचना
टेक्सास शहर आणि राज्यात पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उद्भवलं आहे. पाणी उपलब्ध होत असलं तरी, मिळणारं पाणी उकळून पिण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. बर्फाच्या रुपात उपलब्ध असलेल्या पाण्याचा नागरिकांना आधार घेतला असला तरी, ते पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT