Wall Street_USA 
ग्लोबल

अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली; आगामी काळात मंदीचे संकेत?

काही दिवसांपूर्वी जो बायडन यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असल्याचा इन्कार केला होता.

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२२) ही अर्थव्यवस्था गडगडली असून तिच्यामध्ये ०.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील ही सलग दुसरी घट आहे. ही अवस्था आगामी काळात मंदीचे संकेत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (US economy shrinks for second straight quarter furthers recession fears)

युएस ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अॅनालेसिसच्या (बीईए) माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीत १.६ टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर पुन्हा एप्रिल ते जून या तिमाहीतही जीडीपीत घट झाल्यानं ही तांत्रिक मंदीची नांदी असल्याचं सूचित करत आहे.

रिअल जीडीपीत घट दिसून येणं याचा अर्थ खासगी संस्थांची गुंतवणूक, रेसिडेन्शिल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट, अमेरिकन सरकारचा महसूली खर्च, राज्ये आणि स्थानिक सरकारांचा महसुली खर्च तसेच नॉन रेसिडेन्शिअल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट यांच्यामध्ये काही प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबर निर्यात आणि वैयक्तिक खर्चात वाढ झाल्यानं जीडीपीत घट नोंदवली गेल्याच बीईएनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत नसल्याचं म्हटलं होतं. माझ्या दृष्टीनं रोजगाराचा दर अद्यापही इतिहासातील सर्वाधिक कमी पातळीवर आहे. त्याचबरोबर लोकांच्या गुंतवणूकीकडेही आमचं लक्ष आहे. अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर होईल, अशी आशा व्यक्त करताना मला वाटत नाही आम्ही मंदीकडे वाटचाल करत आहोत, असंही बायडन यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT