us-election2020 change
us-election2020 change 
ग्लोबल

US Election 2020 : बदल अंशात्मक असणार 

डॉ.श्रीकांत परांजपे

डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याने अमेरिकेच्या भारताबाबतच्या धोरणात काय फरक पडेल, याविषयी उत्सुकता वाटणे साहजिक आहे. परंतु सध्याच्या जागतिक राजकारणाचे स्वरूप आणि अमेरिकेचे राष्ट्रीय हितसंबंध लक्षात घेता फार मोठे, मूलभूत धोरणात्मक बदल संभवत नाहीत. सत्तांतर झाल्यामुळे कारभाराची शैली, भाषा यात बदल नक्कीच होईल, पण धोरणांची दिशा बऱ्याच अंशी तीच राहील. 

प्रचारात ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले त्यावरून डेमोक्रॅटिक पक्ष चीनच्या बाबतीत सौम्य आहे आणि ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष जहाल आहे, असा समज होणे साहजिक आहे. परंतु प्रत्यक्षात ट्रम्प यांच्या काळात सामरिक व व्यूहरचनात्मक बाबतीत जो काही पुढाकार घेतला, तो याही पुढे चालू राहील. भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी परस्पर सहकार्याच्या दिशेने सुरु केलेले प्रयत्न (क्वाड) याही पुढे कायम राहतील. उपग्रहामार्फत मिळणाऱ्या गुप्तचर माहितीच्या आदानप्रदानाचा भारत व अमेरिका यांच्यात जो समझोता झाला आहे, त्याही बाबतीत बायडेन यांचे प्रशासन काही वेगळी भूमिका घेईल, असे वाटत नाही. चीनचा उपद्रव केवळ भारताला होतोय आणि अमेरिका केवळ भारताच्या मदतीला धावून येत आहे, असा या करारांचा अर्थ नाही. चीनच्या वर्चस्ववादाचा धोका अमेरिकेलाही जाणवत असून दोन्ही देशांना एकमेकांची गरज भासते आहे. त्यामुळे या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. सत्तेवरील व्यक्ती वा पक्ष बदलला तरी परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे सातत्य असते, हे लक्षात घ्यायला हवे. थोडाफार फरक पडेल तो काश्‍मीर प्रश्‍नाच्या संदर्भात. काश्‍मीर प्रश्‍नाकडे ज्यो बायडेन आणि त्यांचा पक्ष प्रामुख्याने मानवी हक्काच्या चौकटीत पाहात असल्याने तेथे भारत आणि अमेरिका यांच्या दृष्टिकोनातील भेद ठळकपणे समोर येण्याची शक्यता आहे. तेथील हिंसाचार, घुसखोरी, भारताच्या सार्वभौमत्वाला दिले जाणारे आव्हान या मुद्यांबाबत भारताला वाटणारी काळजी यांविषयी बायडेन यांचे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहावे लागेल. म्हणजेच बदल मूलभूत नसतील तर अंशात्मक असू शकतील.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केमिस्ट्रीचे नेमके काय? 
व्यक्तिगत पातळीवर बोलायचे तर मोदी आणि ट्रम्प यांची केमिस्ट्री जुळली होती. तसे बायडेन यांच्या बाबतीत घडेलच असे सांगता येत नाही. कमला हॅरिस यांच्या भारतीयत्वाचा मुद्दा भारतातच जास्त चर्चिला जातो. त्या स्वतः तसे मानतात का हा प्रश्न आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामुळे भारताला काही विशेष लाभ होईल, असे मानणे भ्रामक ठरेल. 

भाषा बदलणार 
`अमेरिका फर्स्ट`चा नारा ट्रम्प यांनी दिला आणि तशी धोरणे आखली. त्याविषयी ते सातत्याने बोलत होते. आता कदाचित भाषेत फरक पडेल. कदाचित ती सौम्य होईल. पण धोरणात बदल होणार नाही. एखाद्या देशात सत्तांतर झाले की देशांतर्गत पातळीवर काही वेगळे निर्णय घेतले जातात, आधीचे काही रद्दबातल ठरवले जातात. परंतु परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत तसे घडत नाही. त्या सूत्राचा प्रत्यय याहीवेळी येईल. एक उदाहरण देण्यासारखे आहे. इंदिरा गांधींचा पराभव करून सत्तेवर आलेल्या जनता पक्षाने वास्तविक अलिप्ततेचेच धोरण कायम ठेवले होते. पण त्याला त्यांनी नाव मात्र `जेन्युइन नॉन अलाइनमेन्ट` दिले. अमेरिकी राज्यकर्त्यांच्या भाषेतही फरक पडेल, मात्र काही आमूलाग्र बदल घडेल असे वाटत नाही. इराणच्या बाबतीही लगेच मोठा बदल संभवत नाही. कॅनडा, मेक्सिको यांच्याबरोबर (`नाफ्ता`) व्यापार करार नुकताच नव्याने करण्यात आला आहे. तो कायम राहील. मेक्सिकोच्या संदर्भात मात्र धोरणात्मक दिशा वेगळी असेल. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक बाबतींत बदल 
स्थलांतरितांच्या बाबतीतही ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळे धोरण स्वीकारले जाईल. विविध जागतिक जबाबदाऱ्यांमधून अंग काढून घेण्याबाबत ट्रम्प आग्रही होते. तिथे काही प्रमाणात बदल घडेल. अमेरिकेने युरोपच्या संरक्षणाचा खर्च का म्हणून उचलायचा, असा प्रश्न ट्रम्प  विचारात होते. त्यामुळे युरोप आणि अमेरिका संबंधांत तणाव निर्माण झाला होता. तो आता कमी होईल. `क्लायमेट चेंज`संबंधातही अमेरिका आता सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता आहे, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत ट्रम्प यांनी घेतलेली बाहेर पडण्याची भूमिका पूर्णपणे बदलेल, असे वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT